बाकलीवाल विद्यालयात क्राफ्ट वर्क पाणीपात्र – अन्नपात्र स्पर्धा

चिमण्या वाचविण्यासाठी घराच्या छतावर पाणीपात्र ठेवण्याचे आवाहन


मंगरुळपीर – जागतीक चिमणी दिनानिमित्त २० मार्च रोजी स्थानिक श्री बाकलीवाल विद्यालयात एनसीसी अधिकारी अमोल काळे यांच्या मार्गदर्शनात आयोेजीत क्राफ्ट वर्क पाणीपात्र – अन्नपात्र स्पर्धेत एनसीसी विद्यार्थ्यांनी सहभाग घेवून पाणीपात्र व अन्नपात्र तयार केले. तसेच रखरखत्या उन्हाळ्यात पर्यावरणासाठी पोषक असणार्‍या चिमण्या वाचविण्यासाठी नागरीकांनी आपआपल्या घरावर पाणीपात्र ठेवण्याचे आवाहन केले.
चिमण्यांना रखरखत्या उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागते. अनेक पक्षी पाणी न मिळाल्याने आपला जीव सोडतात. आजच्या डिजीटल युगात मोबाईल टॉवरची संख्या झपाट्याने वाढत आहे. परंतु झाडांची संख्या कमी होत असल्यामुळे निसर्गाचा एक भाग असणार्‍या पक्षांची संख्या कमी झाली आहे. या सर्व कारणामुळे पक्षांना अन्न, पाणी व निवारा मिळणे कठीण झाले आहे. त्यामुळेच पक्षांप्रती संवेदना जागृत व्हावी या उदात्त हेतूने जागतीक चिमणी दिनाचे औचित्य साधून श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी विद्याथ्यार्र्ंनी क्राफ्ट वर्क पाणीपात्र-अन्नपात्र स्पर्धेत सहभाग घेवून चिमण्यांसाठी पाणीपात्र व अन्नपात्र बनविले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक विनायक काळे, द्वितीय अक्षरा गायकवाड, तृतीय पायल धनगर, प्रोत्साहनपर शितल इंगळे, कृष्णा मुसळे आदींनी पटकावला. या स्पर्धेत एकूण ४१ विद्यार्थी व विद्यार्थीनींनी सहभाग नोंदविला. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, कलाशिक्षक अमोल काळे यांनी कौतूक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *