मंगरुळपीर:-वाशिम येथील जुनी आय.यु.डी.पी.परिसर स्थित श्री संत गजानन महाराज मंदिर येथे श्री राम जन्मोत्सव व श्री संत गजानन मंदिराच्या १७ व्या वर्धापनदिन महोत्सवा निमित्त बुधवार दि.२२.०३.२०२३(गुढीपाडवा) ते गुरुवार दि.३०.०३.२०२३(रामनवमी) दररोज दुपारी १ ते सायं.६ पर्यंत ह.भ.प.श्री.शेषरावजी महाराज गायकवाड यांच्या अमृतमय वाणीतून भव्य संगीतमय श्री शिव महापुराण ज्ञानयज्ञ कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच या महोत्सवा निमित्त गुरुवार दि.३०.०३.२०२३(रामनवमी) रोजी सकाळी ५ ते ७.३० ‘श्रीं’ चा महाअभिषेक व महाआरती,सकाळी ७.३० ते ९ महाकाली देवीस अभिषेक व साडी-चोळी अर्पण सोहळा,सकाळी १० ते १२ श्री राम जन्मोत्सवा निमित्त ह.भ.प.श्री.श्रीकृष्ण पाटील महाराज वाशिम यांचे काल्याचे कीर्तन,दुपारी १२ ते रात्री ८ पर्यंत भव्य महाप्रसाद वितरण व रात्री ८ ते १० भजन संध्या अश्या विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून परिसरातील भक्तांनी वरील सर्व कार्यक्रमाचा मोठया संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.