महाराष्ट्रातील राजकारण आणि पक्षवाढीसंदर्भात केली चर्चा
सचिन बिद्री:उस्मानाबाद
भारत राष्ट्र समिती पक्षाचे नेते प्रशांत नवगिरे यांनी नुकतीच तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष के .चंद्रशेखर राव यांची भेट घेतली .
गेल्या महिन्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतून बी आर एस मध्ये प्रवेश केलेले उस्मानाबाद जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांनी जिल्ह्यातील व महाराष्ट्रातील इतर ठिकाणच्या कांही प्रमुख राजकिय व्यक्तिंच्या बी आर एस पक्षप्रवेशासंदर्भात पक्षाचे अध्यक्ष के . चंद्रशेखर राव यांची वैयक्तिक भेट घेतली .
यावेळी महाराष्ट्रातील भारत राष्ट्र समिती पक्ष वाढीसंदर्भात व कांही महत्वाच्या राजकिय विषयांवर सविस्तर चर्चा झाली . के . चंद्रशेखर राव यांना महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीची प्रतिमा देवून प्रशांत नवगिरे यांनी त्यांचा सत्कार केला. उस्मानाबाद जिल्हा दौर्यावर येण्याचे निमंत्रण श्री नवगिरे यांनी त्यांना दिले असल्याचे प्रशांत नवगिरे यांनी एनटीव्हीशी बोलताना सांगितले.