सचिन बिद्री:उमरगा
शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांचे मोठ्या उत्साहात स्वागत शाळेच्या पहिल्या दिवशी मान्यवर आणि शाळेतील सर्व शिक्षकांच्या वतीने करण्यात आले. यावेळी शाळेला रंगबेरंगी फुग्यानी सजवलेले दिसून आले.
तालुक्यातील नामवंत कॉन्ट्रॅक्टर विजय काळे यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे तर शाळेतील शिक्षक विद्यानंद सुत्रावे, सदानंद कुंभार, संजय रुपाजी, बलभीम चव्हाण, बशिर शेख, सरीता उपासे, सोनाली मुसळे,शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड, वनमाला वाले, सुनिता राठोड उपस्थित होते.शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांमध्ये मोठा उत्साह दिसत होता पहिल्या दिवशीच मुलांची उपस्थिती लक्षणीय होती. शाळेतील 100% विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आले अशी माहिती मुख्याध्यापक श्री मोरे यांनी दिली.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सरिता उपासे तर आभार शिल्पा चंदनशिवे यांनी मानले.