सचिन बिद्री:उमरगा
जे विद्यार्थी आर्थिक बिकट परिस्थितीत आहेत ,ज्याला शिक्षणाची आवड आहे,शाळेत अत्यंत हुशार आहे, विशेष करून ज्या विद्यार्थ्यांचे वडिलांचे छत्र हरवले आहे अश्या या होतकरू अनाथ विद्यार्थांना ज्ञानाची शिदोरी बांधनाऱ्या त्या पालकाचे शब्दात कौतुक किंवा मूल्यांकन होऊच शकत नाही.गरजू आणि गरीब, होतकरू विद्यार्थ्यांतील टँलेंट शोधून कुणी त्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारलं. तर कुणी वर्षानुवर्षे अशा मुलांची शैक्षणिक वाटचाल सुलभ बनावी, गरीब कुटुंबीयांत शिक्षणाचा प्रचार, प्रसार व्हावा म्हणून त्यांना आपापल्या परीने आर्थिक हातभार लावतात. सामान्य कुटुंबातील मुलांच्या जीवनात सुखकर्ता ठरलेल्या समाजातील काही दानशूर व्यक्ती उमरगा शहर व परिसरात दिसून येतात. शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरे यांच्या अथक परिश्रमाने या जि प शाळेचे केवळ भौतिक परिसर बदलत नसून शाळेच्या गुणवंत्तेतही लाक्षनिक भर पडत आहे. आयुष्यभर ज्ञानार्जनाचे कार्य करणाऱ्या शिक्षकांपैकी काहीजण निवृत्तीनंतरही वडिलकीच्या नात्याने सामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांचे आधारवड ठरलेले या जि प शाळेत बरेच उदाहरणं आहेत.
आपल्या वाढदिवसानिमित्ताने होणारे वायपट खर्च टाळून तोच पैसा एखाद्या आधारहीन अनाथ व हुशार मुलीच्या शिक्षणासाठी करण्याचा मानस उमरगा शहरातील उद्योजक शंतनू सगर यांनी एक वर्षांपूर्वी घेतला होता, तेंव्हा जि प शाळेतील वैष्णवी केदारे हिची निवड करून तिला शैक्षणिक साहित्य वाटप केले होते तर शैक्षणिक सहलीसाठी पण शंतनू सगर यांनी पुढाकार घेत कु वैष्णवीला महाबळेश्वर, सातारा, अकोला,अजिंठा वेरूळ आदी ठिकाणी तीन दिवसाच्या सहलीला पाठवले होते.आज वैष्णवी तिच्या शैक्षणिक क्षेत्रात काहीही आवश्यकता भासल्यास निश्चिन्तपणे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांच्या माध्यमातून हक्काने आपले शैक्षणिक पालक ‘शंतनू सगर’ यांना कळविते आणि तिची गरज,शैक्षणिक आवश्यकता तत्परतेने शंतनू सगर सोडवतात.शाळेचा आज दि 15 म्हणजे पहिला दिवस यनिमित्ताने शंतनू सगर यांनी वैष्णवीला नवे दप्तर, वह्या, पेनाचा सेट, पेन्सिल आदी साहित्य वैष्णवीला दिले.यावेळी वैष्णवीची आई वनिता केदारे या पण उपस्थित होत्या.
कु.वैष्णवी ही विद्यार्थिनी केवळ अभ्यासावर लक्ष केंद्रित करून आपले ध्येय गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.तिच्यात अभ्यासू अन् जिज्ञासू वृत्ती वाढत आहे.पाचवीत शिकणारी कु वैष्णवी केदारे हिने शिष्यव्रती परीक्षेत घवघवीत यश संपादन करीत 200 पैकी 178 गुण मिळवून शिष्यवृत्तीस पात्र ठरली असून इयत्ता पाचवीच्या परीक्षेत 95% पेक्षा अधिक मार्क घेऊन सहावीत गेली आहे.
शाळेच्या पहिल्याच दिवशी संपन्न या पहिल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक पद्माकर मोरे होते, सूत्रसंचालन शिक्षिका सरिता उपासे यांनी केले यावेळी शाळेतील शिक्षक विद्यानंद सुत्रावे, सदानंद कुंभार, संजय रुपाजी, बलभीम चव्हाण, बशिर शेख, सरीता उपासे,सोनाली मुसळे,शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड, वनमाला वाले, सुनिता राठोड यांच्यासह संतोष सूर्यवंशी,रुमान शेख आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.