उमरगा (दि. 15)
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दहावीनंतर बाहेर जाऊन अकरावी बारावी आणि मेडिकल व इंजिनिअरिंगची तयारी करत असताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते यासाठीच विद्यार्थ्यांना नीट आणि सीईटी साठी भारत शिक्षण संस्थेच्या श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात गेल्या वर्षी सुरु केलेल्या सुपर सिक्सटीन स्वतंत्र मध्ये सोळा विद्यार्थ्यांनी यश संपादन केले विद्यार्थ्यांचे नीट परीक्षेतील हे यश कौतुकास्पद आहेच त्याचबरोबर इतरांना प्रोत्साहन देणारीआहे.

आमच्या महाविद्यालयातील शिक्षकांवर विश्वास ठेवून कुठल्याच क्लासला प्रवेश न घेता मिळवलेले हे यश नक्कीच उभारी देणारे आहे. आर्थिक परिस्थिती मुळे कुठलाही विद्यार्थी उच्चशिक्षणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता आम्ही घेत आहोत असे प्रतिपादन भारत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष शिवाजीराव मोरे यांनी केले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात 12 वी उत्तीर्ण होऊन विविध स्पर्धा परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष आश्लेष मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकत्याच जाहीर झालेल्या बोर्ड तसेच नीट आणि सीईटी परीक्षांमध्ये नेत्रदीपक यश मिळवून आपली परंपरा कायम ठेवली आहे. कला शाखेतील विद्यार्थी पटेल मेहताब समदानी हा 86.17% गुण घेऊन शाखेतून तसेच महाविद्यालयातुन प्रथम आला आहे, द्वितीय कु मस्के प्रेरणा सुभाष(84.83%), तृतीय कु भोसले क्षितिजा दत्तात्रय(83.83%). विज्ञान शाखेतून कु मुरशद सुमैया नजीरशाह(84.50%), द्वितीय अलगुडे श्रीपाद दिगंबर(82.50%), तृतीय पाटील प्रतीक प्रदीप(81.33%). वाणिज्य शाखेतून प्रथम कु चांदुरे निकिता विठ्ठल(82.17%), द्वितीय कु यादव प्रतिभा दिनकर(77.33%), तृतीय सुरवसे सुरज शंकर(76.17%) या विद्यार्थी गुणानुक्रमे आले आहेत. यासोबतच नीट आणि सीईटी परीक्षेतही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. PCB सीईटी मधून नलावडे दिव्या प्रभाकर या विद्यार्थिनीने 99.61 परसेंटाईल घेऊन प्रथम आली आहे. PCM सीईटी मधून अलगुडे श्रीपाद दिगंबर 98.80 परसेंटाईल घेऊन प्रथम आला आहे. PCB सीईटी तील इतर गुणवंत विद्यार्थी असे मुरशद सुमैया(97.93), निंबाळकर रेणुका(96.89), जाधव महावीर(94.00), पठाण सादिया(92.66), ब्येळे प्रणिता(88.17), भुसारे आकाश(86.67), दूधभाते आरती(86.55), कुंभार अनुशा(85.67), चव्हाण संकेत(85.67), बेंडगे प्रतीक्षा(83.76), गायकवाड सुहानी(83.07), कांबळे संघप्रिया(80.39), कोणे संध्याराणी(80.34). PCM सीईटी मधील यशवंत विद्यार्थी असे चव्हाण समर्थ(), कुलकर्णी अथर्व(91.22),पाटील बाबासाहेब(84.51), उपासे वैष्णवी(84.51), कांबळे गौरव(81.03), कुंभार भीमाशंकर(81.03) विशेष म्हणजे नीट सारख्या परीक्षेतही ग्रामीण भागातील विद्यार्थी असूनही महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चांगले यश मिळवले आहे.

कु मुरशद सुमैया हिने नीट परीक्षेमध्ये 387, कु पालमपल्ले मयुरी 324, कु निंबाळकर रेणुका 320, जाधव महावीर 303 असे गुण मिळवून BDS आणि BAMS च्या प्रवेशास पात्र झाले आहेत. भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे यांनी प्रायोगिक तत्त्वावर केवळ आठ महिन्यापूर्वी सुपर सिक्सटीन स्वतंत्र बॅच सुरू केली होती पहिल्याच वर्षी या बॅचला यश प्राप्त झाले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी एच जाधव, उपप्राचार्य डॉ संजय अस्वले, डॉ विलास इंगळे, डॉ जाजनूरकर, प्रा जी एस मोरे, पर्यवेक्षक प्रा शैलेश महामुनी, सीईटी कोओर्डीनेटर प्रा एन एल गायकवाड, ICC बॅच चे कोओर्डीनेटर प्रा डी टी पाटील, कार्यालय अधीक्षक नितीन कोराळे, विद्यार्थी पालक आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *