सचिन बिद्री:उमरगा
उमरगा तालुक्यातील कृषी सेवा केंद्रावर वाढीव दराने होणाऱ्या खते, बी, बियानांच्या विक्रीवर तात्काळ चौकशी करून कारवाई करा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दि 16 जून रोजी तालुका कृषी अधिकारी यांना निवेदणाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात म्हटले आहे की उमरगा तालुक्यामध्ये कृषी सेवा केंद्रामार्फत शेतकऱ्यांना पुरवण्यात येत असलेली खते व बि-बियांनाची विक्री निर्धारित किमती पेक्षा जास्त भावाने होत आहे.याबाबत तात्काळ चौकशी करून जास्तीची रक्कम घेणाऱ्या कृषी केंद्रावर तात्काळ कार्यवाळी करावी अशी विनंती करण्यात आली आहे.
ह्या प्रसंगी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुकाध्यक्ष रामेश्वर सुर्यवंशी, तालुका कार्याध्यक्ष वजीर शेख सर, सामाजिक कार्यकर्ते करीम शेख,शेतकरी रवींद्र शिंदे, गायकवाड डीग्गी उपस्थित होते.