(सचिन बिद्री:उमरगा) ज्ञानज्योती बहुउद्देशिय सामजिक संस्था उमरगा च्या वतीने दरवर्षी १४ वर्षांपासून गुणवंत विद्यार्थी पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केला जातो. या कार्यक्रमात कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार वितरण करण्यात येतो.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष प्रमुख मंगेश चिवटे हे राज्यातील अनेक गरीब, गरजु रुग्णांना मोठया प्रमाणात मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून मदत करत असल्याबद्दल त्यांना आरोग्यदुत पुरस्कार. सामजिक कार्यकर्त्या सौ.रेखाताई सुर्यवंशी ह्यांचे समाजसेवेचे कार्य बघता त्यांना उत्कृष्ठ समाजसेविका पुरस्कार, माजी सैनिक श्री.शहाजी चालुक्य हे माजी सैनिकांचे विविध प्रश्नांच्या अनुषंगाने कार्य करत असुन तसेच ते माजी सैनिक पतसंस्था उत्तमपणे चालवत असल्याबद्दल त्यांना सैनिक पुरस्कार व जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान रुग्णवाहिका चालक श्री.शेषेराव लवटे यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातुन शेकडो रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत करीत असल्याबद्दल त्यांना रुग्णसेवक पुरस्कार तसेच ॲड.अमर अरुणराव पवार हे पेशाने वकील असुन सुद्धा ते शेतीकडे वळले असुन एक प्रगतशील शेतकरी असल्याचा मान मिळवला त्याबद्दल त्यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे.
वरील सर्व मान्यवरांना दि.02/07/2023 रोजी होणाऱ्या नियोजित कार्यक्रमात पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष आमदार ज्ञानराज चौगुले, सचिव प्रदीप मदने, उपाध्यक्ष विजय वडदरे यांनी दिली.
प्रतिनिधी सचिन बिद्री