वाशिम:-पो.स्टे कारंजा ग्रामिण जि. वाशिम येथे दि.१९/०६/२३ रोजी फीर्यादी नामे मोहन सदाशिव शिंगारे, वय ५६ वर्ष, व्यवसाय चालक (विदर्भ ट्रॅव्हल्स) रा. कॉटन मार्केट जवळ यवतमाळ यांनी जबानी रिपोर्ट दिला की दि.१७/०६/२३ रोजी नागपुर ते पुणे विदर्भ ट्रॅव्हल्स ने प्रवासी घेवून जात असतांना कारंजा वरून निघाल्यावर समृद्धी महामार्गावरुन जात असतांना कारंजा टोल पासून काही अंतरावर रात्री अंदाजे ११/४५ वाजताचे दरम्यान समृध्दी रोडचे वरून जाणाऱ्या ओव्हर ब्रिज वरून काही अज्ञात लोकांनी लक्झरी बस वर दगड फेकून मारले. त्यामुळे चालक यांनी अंदाजे २०० मीटर समोर नेवुन बस थांबविली. अज्ञात लोकांनी लक्झरी बस वर दगड मारल्यामुळे बसच्या काचा फुटल्या व बस मध्ये बसुन असलेला प्रवासी नामे दयाराम हरी राठोड रा.चिखली ता. दारव्हा जि. यवतमाळ याचे कानाजवळ दगड लागल्याने जख्मी झाला त्याच वेळी मागुन येणाऱ्या परपल लक्झरी बसवरदेखील दगड मारुन परपल बसच्या काचा फोडल्या. घटनास्थळी पोलीस अॅम्बुलंस व समृध्दी महामार्ग चे पेट्रोलींग कर्मचारी दाखल झाले व त्यांनी दगड लागल्यामुळे जख्मी प्रवासी नामे दयाराम हरी राठोड याला अॅम्बुलंस ने दवाखान्यात नेण्यात आले व घटनास्थळावर पोलीस तसेच समृध्दी महामार्गचे पेट्रोलींग कर्मचारी रात्री ०२/०० वाजे पर्यंत पेट्रोलिंग करून शोध घेतला परंतु दगड मारनारे लोकं दिसुन आले नाही. अशा फीर्यादीचे रिपोर्ट वरून पो.स्टे कारंजा ग्रामीण येथे अपराध क्र २८७/२३ कलम ३३६, ३३७,३३८, ४२७ भा.द.वि वा गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर गुन्हयाचे तपासात विषेश तपास पथक नेमुन समृध्दी महामार्गाचे आजुबाजुचे परीसरात गुप्त बातमीदाराकडुन माहीती घेण्यात आली असून बाजुचे गावात अज्ञात आरोपींचा शोध घेण्यात आला तसेच नागपुर औरंगाबाद हायवे वरील ढाब्यावरील सि.सि.टी.व्ही. फुटेज तपासुन संशयीत आरोपी नामे १) शुभम दशरथ हांडे, वय २३ वर्ष, रा. पिंपळगाव हांडे २) राम दिगांबर हांडे, वय २० वर्ष ३) माधव गजानन वाळके, वय २३ वर्ष, दोन्ही रा.कीनखेड यांना ताब्यात घेवुन कसुन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा केला असल्याचे मान्य केले. नमुद आरोपींनी दि.१७/०६/२३ रोजी ढाब्यावर जेवन करुन त्यांचे गावी परत जात असतांना समृध्दी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनातील लोकांना गंभीर जखमी करण्याच्या उद्देश्याने ओव्हर ब्रिजवरुन समृध्दी महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक केली व अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले वरून सदर गुन्ह्यात कलम ३२६ भा.दं.वि. समाविष्ठ करण्यात आले आहे.
सदर कार्यवाही मा.पोलीस अधिक्षक श्री.बच्चन सिंह(IPS), अपर पोलीस अधिक्षक श्री.भारत तांगडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.जगदीश पांडे यांचे मार्गदर्शनात पो.नि.सुनिल वानखडे, पोलीस उपनिरिक्षक चंदन वानखडे, स.फौ.प्रेमसिंग जाधव, पो.हे.कॉ.युसुफ भरीवाले, चालक पो.हे.कॉ गजानन लोखंडे यांनी केली.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *