section and everything up until
* * @package Newsup */?> संभाजीनगर पच्छिम विधानसभा मतदारसंघात संघटनेची आढावा बैठक | Ntv News Marathi

वाळुज/ संभाजीनगर

संभाजीनगर पच्छिम विधानसभा मतदारसंघात संघटनेची आढावा बैठक पंढरपूर व बजाजनगर येथे पार पडली. याप्रसंगी शिवसेना पश्चिम विधानसभा  सहसंपर्क प्रमुख श्री विजय देशमुख शिवसेना उपजिल्हाप्रमुख बप्पा दळवी तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड उपतालुका प्रमुख विष्णु जाधव , गणेश नवले, कैलास भोकरे, सुभाष साबळे, सचिन राठोड, सुदाम भंडे, महेंद्र खोतकर, कपिंद्र पेरे उपशहर प्रमुख बिबन सय्यद, विश्वास येवले, नामदेव सागडे विभागप्रमुख गणेश सुर्यवंशी, लखन सलामपुरे, दीपक कानडे, सतीश हिवाळे, संतोष चंदन, मच्छिंद्र झळके, उपविभागप्रमुख अमोल पोटे आदींची उपस्थिती होती.

       यावेळी मार्गदर्शन करताना तालुका प्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी उपस्थितांना आवाहन केले कि, येणार्या निवडणुकांमध्ये पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसणार्या गद्दारांना आसमान दाखविल्याशिवाय शांत बसायचे नाही. सर्व निष्ठावंत शिवसैनिकांनी मनाशी गाठ बांधल्यास अशक्य काहीच नाही. असा निर्धार करण्याचे आवाहन यावेळी तालुकाप्रमुख बाळासाहेब गायकवाड यांनी केले.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *