विभाग प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीने तालुक्यातील जनतेला नाहक त्राससिरोंचा...सिरोंचा पंचायत समिती कार्यालयात गट विकास अधिकारी व विविध विभागांचे कर्मचाऱ्यांच्या गैरहजेरीत चक्क एका कुत्र्याने कार्यालयाचे प्रत्येक विभागात घुसून हैदोस घातल्याचे सांबाळल्याचे चित्र समोर आल्याने पंचायत विभागाच्या निष्क्रियतेबद्दल सगळीकडे खमंग चर्चा होतांना दिसून येत आहे.
दिवाळी निमित्त सरकारी व निमसरकारी कार्यालयांना सलग पाच दिवस सुट्या होते.या सुट्यांमध्ये पंचायत विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी आपआपल्या गावी गेले.दिवाळीचे सुट्या संपल्यावर सुद्धा एक दोन दिवस पंचायत समिती कार्यालयात अधिकारी व कर्मचारी गैरहजरच होते.अश्यातच एका कुत्र्याने सिरोंचा येथील पंचायत समिती कार्यालयात घुसून धुमाकूळ घातल्याने येथील गट विकास अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
ग्रामीण भागातील जनतेसाठी पंचायत समिती कार्यालय हे मुख्य केंद्रबिंदू असल्याने या कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कार्यालयातील अनुउपस्थिती हे चिंतनीय बाब आहे.अश्यातच राज्य सरकारने कार्यालयीन कामकाज पाच दिवसाच्या आठवडा केल्याने याची फटका सर्वसामान्य जनतेला बसत आहे.राज्य सरकारने पाच दिवसाचे आठवडा केल्यापासून सरकारी कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचारी फक्त तीन दिवसच उपस्थित राहत असल्याने येथील अनेक कार्यालये ओसाड पडून राहत आहे.हे विशेष