गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून मार्कंडा (कं) येतील वन विकासाच्या जंगलात भंगाराम तळोधी येथील मेंढपाळाच्या मुलास दिनांक 15 नोव्हेंबर रोजी बिपट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली पुन्हा बिबट्याच्या हातून कधीही नूकसान होऊ शकते. हे नाकारता येत नाही पुन्हा कोणत्याही प्रकारचे बिबट्या कडून मानवी हल्ले होण्याअगोदर वन विभागाने लक्ष देऊन लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद बंद करण्यात यावे

मारकंडा कं गावाभोवती जंगल लागून असल्याने शेतकरी शेतात जाण्याकरीता घाबरत आहेत शेतात रात्रो राखण्यासाठी न गेल्यास हातात आलेल्या धान व कापूस पिकांची वन्य प्राण्याकडून मोठी नूकसान होते आहे या करीता ग्रामस्थांची चिंता वाढली आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन वन विभागाने उपाय योजना करण्याची गरज आहे
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली