गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात बिबट्याची दहशत पसरली असून चपराळा वन्यजीव अभयारण्यातील बिपट्या मानवी हल्ले करीत आहे दिनांक 13.9.2021रविवार रोजी आष्टी पेपर मिल कालनीतील अंश मोरे या मुलावर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले होते ही घटना ताजी असतानाच मार्कंडा (कं) येतील वन विकासाच्या जंगलात भंगाराम तळोधी येथील मेंढपाळाच्या मुलास आज दिनांक 15 नोव्हेंबर रोजी बिपट्याने हल्ला करून जागीच ठार केल्याची दुर्दैवी घटना घडली वनविभागाकडे या बिबट्याला जेरबंद करण्याची वारंवार मागणी करून सुद्धा वनविभाग या बिबट्याला जेरबंद करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे

आता किती बिबट्याच्या हातून कीती माणसाचे बळी घेण्याची वनविभाग वाट पाहत आहे आष्टी पेपरमील कॉलनी मध्ये झालेल्या घटनेपासून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी करूनसुद्धा वनविभाग लक्ष देत नसल्याने आत्ता रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याची वेळ येऊ न देता लवकरात लवकर बिबट्याला जेरबंद बंद करण्यात यावे व गडचिरोली जिल्ह्यातील पालकमंत्री या घडत असलेल्या घटनेकडे लक्ष द्यावे अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य सौ रुपाली ताई पंदीलवार यांनी केली आहे
श्री भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली