छत्रपती संभाजीनगर
सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगर द-यांमधे आणि सावळदबारा परिसरातील रानात आणि वनात चोहीकडे मोठय़ा प्रमाणात पळस वृक्ष फुलांनी बहरले आहे. पळसांचे फुले अगदी सर्वांना आकर्षित करित आहे लाल व केशरी रंगाच्या फुलांनी बहरलेली पळसाची वृक्ष सध्या सर्वाचे लक्ष वेधून घेत आहेत. काही पळसांचे वृक्ष तर मोराच्या फुललेल्या पिसा-यासारखे आकार परिधान करुन सर्वांना आकर्षित करुन मन जिंकत आहे व मोह भुरळ पाडत आहे डोंगर-दऱ्या आणि शेताचे बांध फुलांनी लगडलेल्या पळसाच्या झाडाने शोभून दिसत आहेत. सध्याला रानामधे बांधावरती आणि वनामधे पळसांच्या वृक्षा खाली फुलांच्या पडलेल्या फोड हे बघुन तर सर्वांचे मन त्या ठिकाणी रमत आहे व अशा ठिकाणी त्या फुलांच्या खाली गळालेल्या फोडांमधे कळ्यांमधे हे सुंदर वातावरण बघुन सर्वांचे अधिर मन होताना दिसुन येत आहे याच फुलांवरती मधमाश्यांचा कळप वावर मोठ्याप्रमानात आढळुन येत आहे मधमाशा या फुलांमधील गोड रस पिऊन मध तय्यार करत आहे
शिशिराची थंडी ओसरायला लागली, पानगळीने उघडी पडलेली वृक्षराजी नव्या पालवीचे लेणे अंगावर मिरवायला लागली की वसंताची चाहुल लागते. या वसंतात फक्त रंगांची उधळण, रंगोत्सव सुरू होतो निसर्गाचा. शिशिरात बोडक्या झालेल्या शेताला केशरी, लाल रंगात न्हाऊ घालणारा पळस बहरला आहे. वसंताचे स्वागत करण्यासाठी पळस नटलेला चोहीकडे पाहण्यास मिळत आहे. पळसांच्या फांदीवर लगडलेली फुले विस्तवाच्या गोळ्यांसारखे लाल भडक दिसत आहेत. पळसावरती एक म्हन सुध्दा प्रचलित आहे ती म्हनजे
कुठेही गेले तरी पळसाला पाने तीनच, अशी म्हण प्रचलित असुन पळसाची पानेही फार उपयोगी आहेत. पूर्वी या पानांपासूनच मोठय़ा पंगतीला जेवण देण्यासाठी द्रोण आणि पत्रावळ्या बनविल्या जात असे अत्ता सध्याला ही प्रथा बंद पडताना दिसुन येत आहे मात्र अक्षयतृत्तीया सनाला आज ही पळसांच्या पानांच्या पत्रवाळ्यांचा वापर उपयोग केला जात असतो
पळस हा डोंगराळ भागात किंवा शेताच्या -बांधावर दिसणारा वृक्ष.आहे शेतात जाणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष वेधून घेताना तो दिसत आहे. बहरात आलेला पळस तर अक्षरश: ज्वालेसारखा लाल भडक दिसू लागला आहे. प्रत्येक वेळेस पळस वृक्ष हे होळी रंग पंचमी ला मोठ्याप्रमाणात बहरायचे परंतु या वर्षी होळी – रंगपंचमी एक महिन्याचा कालावधी लांब असुन यावेळेस रंगपंचमी अगोदर पळस बहरलेले दिसुन येत आहे पूर्वी रंगपंचमी धुलिवंदनाला एकमेकांच्या अंगावर टाकण्यासाठी उपयोगात येणारा रंग बनविण्यासाठी पळसांच्या फुलांचा वापर केला जात असे.
तर आयुर्वेदिक औषधी वनस्पती म्हणूनही याचा वापर होत असे. आणि आज ही वापर केला जातो पळसाची फुले पाण्यात टाकून स्नान केले तर त्वचारोग नाहिसा होतो असे ही सांगितले जाते. सध्या पळसांकडे आणि पळसांच्या फुलांकडे लक्ष जाताच पाहणाऱ्याच्या डोळ्यांना भुरळ घालणारा पळस सध्या लाल गडद झाला असून शेतांमध्ये कडक ऊन असतानाही डोळ्यांना थोडा का होईना परंतु दिलासा देणारा म्हणूनच ओळखला जात आहे. सद्याला कडक ऊन्हाळा रुतु सुरु आहे आणि अनेक जातवंत वृक्षांची पानझड होऊन वृक्ष वाळलेल्या सारखे दिसत असुन त्यात पळस वृक्ष मात्र पुर्णपणे रंगबेरंगी फुलांनी बहरलेले असुन त्यात काही पळसांना पळसपापड्या सुद्धा दिसुन येत आहे आणि या पळसपापड्या व लाल केसरी रंगाने पळस मोठ्याप्रमानात बहरलेले फुललेले दिसुन येत आहे
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव छत्रपती संभाजीनगर