दसकोड ग्रामस्थ संतप्त
रस्त्याच्या डांबरीकरणाला २५ वर्षांनी मिळाला मुहूर्त🤔
—ठेकेदाराकडुन तो हि रस्ता निकृष्ट.😔
भरत गवारी,जव्हार
दि.१ मार्च २०२४.
जव्हार सार्वजनिक बांधकाम विभाग विविध भ्रष्टाचाराच्या मुद्यांनी नेहमी चर्चेत असतानाच पुन्हा एकदा बांधकाम विभागातील रस्त्याच्या ठेकेदाराच्या मनमानी कारभाराने बांधकाम विभाग चव्हाट्यावर आला आहे.विकास कामांच्या निविदा दिलेल्या ठेकेदारांच्या कामकाजावर सबंधित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांचे नियंत्रण नसल्याची चर्चा जव्हार तालुक्यात आता रंगू लागली आहे.अधिकाऱ्यांना टक्केवारी देऊन ठेकेदार कामे पदरात पाडून घेतात. त्यात मात्र सामान्य जनता नाहक भरडत आहे तर मर्जीतील ठेकेदार अधिकाऱ्यां कडून पोचले जात आहेत.त्यामुळे शासकीय विकास कामांचा दर्जा निकृष्ट असल्याचे वास्तव जव्हार तालुक्यात उघडकीस आले आहे.
जव्हार तालुक्यात “दसकोड फाटा ते दसकोड गाव” हा साडे-तीन किलोमीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरु आहे.परंतु सबंधित ठेकेदाराकडून हा रस्ता बनविताना केवळ डांबर मिश्रित खडीचा थर लावुन रस्ता बनविल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे.दसकोड रस्त्याच्या निकृष्ट कामाचे व्हिडिओ,फोटो सोशल मिडियात व्हायरल झाल्याने ठेकेदाराच्या कामाचे पितळ उघड झाले.मंजूर निविदेच्या अंदाजपञकानुसार रस्ता ठेकेदाराकडून होत नसल्याने रस्त्याचा दर्जा निकृष्ट असुन बेसुमार आहे.त्यात रस्ता सुरू असताना सबंधित ठेकेदार,इंजिनियर काम चालू असताना उपस्थित राहत नसल्याने ग्रामस्थांना विश्वासात न घेता काम चलाऊ रस्ता केला जात आहे.अशी तक्रार दसकोड ग्रामस्थांनी केली आहे. दसकोड रस्ता दोन-तीन वर्षाआधीच बनविला गेला होता.परंतु पुन्हा बांधकाम विभागाने नव्याने निविदा काढून ठेकेदाराकडून रस्ता केला जात आहे.ज्याठिकाणी रस्त्यावर खडी पसरलेली आहे.त्याच ठिकाणी केवळ ठेकेदाराकडून डांबर मिश्रित खडीचा थर दिला गेलेला आहे.ज्याठिकाणी खरोखरच रस्त्यावर खडी पसरलेली नाही.तिथे मात्र रस्त्याची आवश्यकता असताना सुध्दा ठेकेदाराकडून रस्ता बनविला जात नाही.त्यामुळे रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याचा प्रकार ग्रामस्थांकडून उघडकीस आला आहे.
दसकोड फाटा ते दसकोड गाव हा रस्ता भागडा,मोर्चा पाडा ते ओझर या गावांना जोडला गेला आहे.गेल्या मागील २५ वर्षापासुन ह्या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नव्हते. आता मोठ्या नवसाने रस्त्याच्या डांबरीकरणाला मुहूर्त मिळाला आहे .परंतु ते हि काम ठेकेदाराच्या मनमानीमुळे निकृष्ट रितीने केले जात आहे.त्यामुळे रस्त्याचे काम ठेकेदाराकडून दर्जेदार व्हावे.यासाठी दसकोड ग्रामस्थांची मागणी आहे.परंतु ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे रस्त्याचा दर्जा निकृष्ट असल्याने दसकोड ग्रामस्थांनी जव्हार सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय बदाने यांना रस्त्याच्या चौकशीचे व सबंधित ठेकेदारावर त्वरित कारवाई करण्याचे निवेदन देण्यात आले.
"दसकोड रस्ता ठेकेदाराकडून उत्कृष्ट प्रतिचा केला जावा. हि आमची गावकऱ्यांची मागणी आहे. जेणेकरुन पावसाळ्यात आमच्या गावात परिवहन मंडळाची बससेवा रस्त्याअभावी ४ महिने बंद होणार नाही".
—श्री.सचिन महाले व दसकोड ग्रामस्थ.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मोबा.नं*8408805860.