जिल्हा काँग्रेसचा स्तुत्य उपक्रम; चाळीस संघांचा सहभाग!
वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने भारतीय संगणक युगाचे प्रणेते, देशाचे मा. पंतप्रधान भारतरत्न “स्व. राजीव गांधी चषक” क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले आहे. अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट” व “विजय पाटील फाउंडेशन” यांच्या संयुक्त विद्यमाने आणि वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने दि. १३ व १४ मे २०२३ रोजी वसईतील नरवीर चिमाजी मैदान येथे स्व. राजीव गांधी चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे सलग दोन दिवस चालणाऱ्या या अभिनव व भव्य क्रिकेट स्पर्धेमध्ये भंडारी, आगरी, कोळी, ख्रिश्चन, आदिवासी इत्यादी प्रत्येकी ८ संघ असे मिळून एकूण ४० क्रिकेट संघ सहभाग घेत आहेत. वसई, विरार, नालासोपारा येथील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते आणि काँग्रेसप्रेमींनी जिल्हा काँग्रेसने आयोजित केलेल्या “स्व. राजीव गांधी चषक” क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनात सक्रिय सहभाग नोंदवून आपले योगदान द्यावे असे आवाहन वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी केले आहे. वसई विरार जिल्हा काँग्रेस पक्षाने आयोजित केलेल्या या क्रिकेट स्पर्धेसाठी आपली सर्वांची उपस्थिती निश्चितच मोलाची आहे अशी प्रेमळ साद ओनिल आल्मेडा यांनी नागरिकांना घातली आहे.