औरंगाबाद : सोयगाव तालुक्यातील फर्दापुर पोलीस ठाणे यांच्या तर्फे फर्दापुर पोलीस ठाणे अंतर्गत येना-या गावा गावांत गणेश उत्सव निमित्ताने जाऊन शांतता बैठक घेण्यात आली होती या बैठकी मधे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे ,पोलीस उप निरीक्षक युवराज शिंदे यांनी शांतता बैठक घेऊन सर्वांना मोलाचे मार्गदर्शन केले होते त्याच अनुषंगाने गणेश उत्सव विसर्जन करताना काही अनुचीत गैर प्रकार घडुनये म्हनुण फर्दापुर पोलीस ठाणे यांच्या तर्फे गणेश उत्सव विसर्जन अनुषंगाने रुट मार्च घेण्यात आला या वेळेस फर्दापुर पोलीस ठाण्याचे सर्व पोलीस अधीकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
हा रुट मार्च घेऊन गणेश उत्सव विसर्जन करत असताना काही अनुचीत प्रकार घडुनये त्यासाठी सावळदबारा, देव्हारी ,टिटवी , डाभा, नांदातांडा , घाणेगाव ,चारु मुर्ती , मोलखेडा , पिंपळवाडी , जामठी , रवळा , जवळा, फर्दापुर , असे अनेक गावांत फर्दापुर पोलीस ठाण्या तर्फे गणेश उत्सव विसर्जन साठी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे , पोलीस उप निरीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उत्सव विसर्जन निमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
प्रतिनिधी जब्बार तडवी सोयगाव औरंगाबाद