section and everything up until
* * @package Newsup */?> वाढत्या गुन्हेगारी वर पायबंद घालण्यासाठी शिवसेना उबाठा तर्फे पोलिस प्रशासनाला निवेदन | Ntv News Marathi

बजाजनगर परिसरात गेल्या काही दिवसापासून चैन स्नेचिंग, मोबाईल चोरी, महिला व मुलींना छेडछाड, चौका चौकात टोळीने उभे राहून दादागिरी व आपापसात भांडणे याने सामान्य माणूस हैराण झाला आहे. बजाजनगर परिसरात कामगार भाग असल्याने गुंड प्रवृत्ती च्या लोकांच्या नादी न लागता पोलीस स्टेशन पर्यंत जाण्याची कामगार हिम्मत करत नाहीत त्याच कारणाने अश्या गुंडगिरी करणाऱ्यांना अधिकचे बळ मिळत आहे. कायद्याची कोणतीच तमा न बाळगता परिसरात अजून जास्त प्रमाणात गुंडगिरी फोफावत चालली आहे त्यातच अवैध धंद्या मुळे अल्पवयीन मुले , नवतरुण नशेखोर होत चालली आहे. या सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन बजाजनगर परिसरात वाढत्या गुन्हेगारी वर कडक उपाययोजना कराव्यात करिता एमआयडीसी वाळूजचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कृष्ण शिंदे यांना बजाजनगर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) च्या वतीने शहरप्रमुख सागर शिंदे, उपशहर प्रमुख किशोर खांड्रे व विशाल खंडागळे यांनी निवेदन दिले. यावेळी परिसरातील विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. पोलिस प्रशासन कडून लवकरच ठोस उपाययोजना राबविण्यात येतील ठिकठिकाणी पोलीस कर्मचारी यांची गस्त वाढविली जाईल व दोषींवर कडक कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन वाळूज एमआयडीसी चे पोलीस निरीक्षक कृष्ण शिंदे यांनी दिले.

प्रतिनिधी:- अनिकेत घोडके
NTV न्युज मराठी, वाळूज छत्रपती संभाजीनगर.
मो.8484818400

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *