वाशिम:-मराठी नुतन वर्षाचे स्वागत मानोरा येथील सहारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांसोबत एक दिवस यांच्या सोबत घालवुन व त्यांना विविध भेटवस्तू देऊन लिनेस कल्ब च्या सर्व सदस्य महीलांनी नवीन वर्ष साजरे केले. लिनेस क्लब च्या अध्यक्षा सौ. चंचल खिराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘आनंदाची देवाण-घेवाण’ या उपक्रमाअंतर्गत सहारा वृद्धाश्रमातील आजी-आजोबांना , एक दिवस आनंदाचा, एक दिवस उल्हासाचा, एक दिवस मानुसकीच्या नात्यांचा याची अनुभती करवुन दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संचालक श्री. प्रफुल्ल डेरे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री. रोशन चव्हाण हे होते.विभक्त कुटुंब पद्धतीमुळे आजी-आजोबां यांच्या सारखे आधारवड लोप पावत आहे. व त्यामुळे मुलांवर वाईट संस्कार होत आहेत, मुलांचे यांमुळे नुकसान होऊन त्यांचे भवितव्य धोक्यात येत आहे. म्हणून एकत्रकुंटुंब कसे आवश्यक आहे, याचे महत्व शाळेच्या संचालिका या नात्याने सो. चंचल खिराडे यांनी व्यक्त केले. जमेल तेव्हा आजी-आजोबांना भेटुन आनंद देऊन आर्शिवाद मिळविणार असा निर्धार क्लब च्या सदस्यांनी केला.सहारा वृद्धाश्रमांतील वृद्ध आजी-आजोबांसाठी बेडशीट, बिस्कीट पॅकेट, नाश्ता, आईस्क्रीम असा मनमुराद आठवणींचा ठेवा तर होताच तसेच संगीत खुर्ची, भजन, गित गायन, गप्पा गोष्टी यांची सुद्धा बहारदार मेजवानी लिनेस क्लब च्या सदस्य महीलांकडून आयोजित करण्यात आली होती. निघता – निघता ‘पुन्हा कधी येणार’ या प्रश्नाने तर उपस्थितांच्या सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुरेखा वानखेडे, तेजस्विनी काळे, नैना पाटील, चंदा ठाकुर, गिता वोरा, अश्विनी मिसाळ, स्नेहल देशमुख, मनिषा पांडे, प्रिती अर्धांपुरकर, रंजना बोरकर, रचना मेहता, स्मिता भगत, सुनिता खिराडे, सिमा रघुवंशी, अंजली रत्नपारखी, रुपाली बुधे यांचे सहकार्य लाभले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरूळपीर/वाशिम
मो.8459273206