यंदा हि कोरोना निर्बंधाची उरुसावर टांगती तलवार कायम,कवालींचा कार्यक्रम रद्द
खेळण्यांची दुकाने,पाळणे ,व्हाँटेल यांना कोरोना नियमांमुळे येण्यास मज्जाव
पालघर : जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात होणाऱ्या औलिया पीर शाह सदरोद्दीन चिश्तीचा ५६९ वा उरुसाला जव्हार शहरात आज उत्साहात सुरुवात झाली.हा उरुस २७ ते २९ सप्टेंबर पर्यंत भरणार आहे. पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात हिंदू -मुस्लीम समाजाच्या ऐक्याचे प्रतिक ओळखल्या जाणाऱ्या सदानंद महाराजांचा उरुसाला आज दिमाखात प्रारंभ झाला.जव्हार शहराला संस्थानकालीन शाही वारसा लाभलेली परंपरा जपत हिंदू -मुस्लीम बांधव हा उरुस गुण्या गोविंदाने साजरा करतात.हिंदू बांधवांचे सदानंद महाराज हे जागृत देवस्थान असुन मुस्लीम बांधवांकडून सदरोद्दीन बाबा म्हणून ओळखले जातात.
गेल्या दिड वर्षापासुन कोरोना संकटामुळे हा उरुस साध्या पध्दतीने साजरा केला जातो.यावर्षी हि कोरोना निर्बंधामुळे कवालीचा बहारदार कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.शासनाच्या नियमांचे पालन करुन गर्दी न करता भाविकांकडून हा उरुस साजरा केला जात आहे. इगतपुरी येथिल पिंपरी येथे सदानंद महाराजांचे मुख्य ठाण आहे.पिंपरी येथे भरणारी दर्गा येथूनच जव्हारच्या उरुसाची तारीख आज ही ठरवली जाते.भाद्रपद महिन्यांतील सप्तमी,अष्टमी,नवमी ह्या तीन दिवस हा उरुस भरविला जातो.पालघर,डहाणू, भिवंडी,नाशिक,तारापूर,संगमनेर,या ठिकाणाहून उरुसाला भाविक दरवर्षी येत असतात.कवाल्यांचा कार्यक्रम म्हटले कि,श्रोत्यांना मेजवानी असते.परंतु कारोना सावटामुळे यंदा कवाल्यांचा कार्यक्रम रद्द केला आहे.त्याचबरोबर उरुस म्हटला कि,खेळण्याची दुकाने,पाळणे,मौत का कुआ,खवय्यांसाठी हाँटेल अशी मजा पाहायला मिळते.परंतु हि मजा बच्चे कंपनीला व जव्हारकरांना कोरोना निर्बंधांमुळे अनुभवायला मिळणार नाही.कोरोनाचे नियम पाळुन हा उरुस साध्या पध्दतीने साजरा करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जव्हारच्या उरुसा निमित्त सुन्नी मुस्लीम बांधवाकडून जामा मशिदीला व रस्त्याच्या दुर्तफा सरेख रोशनाई केली असुन ती रोशनाई आलेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फेडल्याशिवाय राहत नाही.अशा हा जव्हारचा शाही उरुस हिंदू-मुस्लीम बांधवांच्या ऐकोप्यामुळे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक महाराष्ट्रात ठरत आहे.
जव्हार प्रतिनिधी
भरत गवारी(पालघर)
मो.नं.8408805860/मो.9404346064.