औरंगाबाद : हजरत जैनोद्दीन शिराजी (दरगाह बाविस ख्वाजा) येथे खुलताबादच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात घेण्यात आलेल्या भव्य आरोग्य चिकित्सा शिबिरास जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.खुलताबाद एमआयएमच्या वतीने आयोजित आरोग्य चिकित्सा व तपासणी शिबिराचे खुलताबाद या ठिकाणी आयोजन करण्यात आले, या शिबिराचे उदघाटन एमआयएम पक्षाचे जिल्हा अध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांचे हस्ते करण्यात आले.यावेळी एमआयएमची जिल्हा कार्यकारिणी उपस्थित होती. या शिबिरास विशेष म्हणजे यावेळी मोफत औषधांचे वाटप आरोग्य विभागातर्फे करण्यात आले.
समाजातील तळागाळातील जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी या करिता खुलताबाद एमआयएमच्या वतीने हे आरोग्य शिबीर शहरात घेण्यात येत आहे. जिल्ह्याचे खासदार सय्यद इम्तियाज़ जलील यांच्या प्रेरणेने हे शिबीर खुलताबादेत आयोजित केले असून तालुक्यातील जनतेने या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.
याचं प्रमाणे या पुढे देखील समाज उपयोगी कार्य एमआयएम पक्षाच्या वतीने करण्यात येतील ,तसेच कोरोनाचे संकट अजून संपले नसून नागरिकांनी काळजी घ्यावी असे मत तालुका अध्यक्ष अब्दुल मजीद मणियार व शहर अध्यक्ष शेख सलीमोद्दीन यांनी व्यक्त केले.
याशिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किरण शिंदे, डॉ. सुहास जगताप,वेरुळ प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. पांडवे,डॉ. ज्योती मॅडम, डॉ. कुटे सर, डॉ.राजपूत, डॉ. गवारे, डॉ. कुलकर्णी, डॉ. आलिया खान, आर. कवडीकर, वैशाली सोनावणे, एस. दिघे, पवार एस., फरीद सिद्दीकी, अनिल पवार, ए.भाले, भावसार, आसिया मॅडम, एस. माने, पल्लावी मुथा, संजीवनी पवार, दीपक बधाने ब्रदर यांच्यासह आरोग्य विभागाचे कर्मचारी एमआयएम पक्षाच्या कार्यकर्ते यांनी आरोग्य शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. व सर्व समाजातील लोकांनी या शिबिराचा लाभ घेऊन समाधान व्यक्त केले.या शिबिरास जवळपास दोन ते अडीच हजार लोकांनी आपली आरोग्य तपासणी केली आहे. शिबिर कार्यक्रमाशेवटी सर्व डॉक्टरांचे एमआयएम पक्षाच्यावतिने बिलाल जलील व जिल्हा अध्यक्ष समीर साजिद बिल्डर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले. व त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
