मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,मा.कृषी मंत्री धनंजय मुंडे, मा. आ. प्रशांत बंब ,
व मा. आ. सतिश चव्हाण यांना शेतकरी कृती समितीच्या वतीने इंजी महेशभाई गुजर, राहुल ढोले पाटील यांनी इमेल द्वारे येत्या पावसाळी अधिवेशनात
कृषीधन(पाळीव प्राणी) अपघात विमा योजना सुरू करा अशी मागणी केली आहे.
मराठवाड्याचे लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या सन्मानार्थ महाराष्ट्र सरकारने स्व.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केल्याने आजपर्यंत या योजनेचा लाभ हजारो शेतकर्यांना व कुटुंबीयांना झाला आहे.
शेतकर्या सोबत शेतात राबणारे व कृषी उन्नती व उत्पन्नात मोलाची भूमिका बजाणार्या पाळीव प्राणी बैल,गाय,म्हैस,बकरी,मेंढी,गाढव व घोडा यांचा अपघात , अकास्मीक, नैसर्गिक
मृत्यू झाल्यास त्यांच्या मालकांना कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळत नाही. वन्य प्राण्याच्या हल्लात शेतकरी जख्मी किंवा मृत्यू झाल्यास शेतकर्यांना नुकसान भरपाई मिळत परंतु पावसाळ्याच्या हंगामात अनेक जनावरांचा सर्पदंशाने किंवा शेतात काम करताना मृत्यू किंवा अपघात, वीज पडणे, पूर, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होतो.अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास शेतकर्यांचे लाखात नुकसान होते.
शेतकर्यांचे पाळी प्राणीचा (गाय,म्हैस,बैल,बकरी,मेंढी,गाढव व घोडा) सर्पदंशाने किंवा शेतात काम करताना मृत्यू किंवा अपघात, वीज पडणे, पूर, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात,वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणामुळे अपघात होतो.अपघातामुळे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास नुकसान भरपाई मिळावी यासाठी एखादी स्वतंत्र योजना पावसाळी अधिवेशनात सुरू करण्यात यावी अशी मागणी इंजी.महेशभाई गुजर,राहुल ढोले पाटील शेतकरी कृती समिती ता.गंगापुर केली आहे त्यानुसार मा. मुख्यमंत्री कार्यालय मुंबई यांनी पुढील कार्यवाही साठी कृषी विभागाकडे पाठवले आहे.
प्रतिनिधी रमेश नेटके गंगापुर छत्रपती संभाजी नगर