55 फुट खोल पाण्यातुन युवकाचा मृतदेह मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या टीम शोधून काढला
फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर तालुक्यातील दस्तापुर येथील धरणात एक यीवक बुडाल्याची माहीती मिळाल्यानंतर अथक परिश्रम करुन मंगरुळपीर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक पिंजर शाखा मंगरुळपीर येथील जवानांची साहसी कार्यवाही करत ५५ फुट खोल असलेल्या पाण्यातुन मृतदेह शोधुन काढला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मंगरुळपीर जि.वाशिम येथील मोहम्मद हुजेफ मो. रियाज्जुद्दीन वय अंदाजे 12 वर्ष रा.वॉर्ड नंबर 05 चेहल पुरा मंगरूळपीर हा ईद निमित्त चारपाच मित्रासह पोहण्यासाठी दस्तापुर येथील धरणावर आला होता.धरणातील पाण्याचा अंदाज न आल्याने एकजन बुडाला असल्याची माहीती मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन संचालित संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दिपक सदाफळे यांना देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता प्राचारण केले तेव्हा लगेच दीपक सदाफळे यांनी आपले मंगरुळपीर शाखेचे अतुल ऊमाळे,गोपाल गीरे,लखन खोडे,मुन्ना मूंदे,रोहन डोंगरे, सिधु इंगोले,शिवा आडात, यांना घटनास्थळी रवाना केले आणी सर्च ऑपरेशन चालु करण्याचे सांगीतले तेव्हा अशी खात्री झाली की धरणातील गाळ काढल्यामुळे यावर्षी धरणात 50 ते 60 फुट पाणी असल्याचे सरपंच यांचे कडुन निष्पन्न झाले. नंतर पिंजर वरुन रेस्क्यु बोट स्कुबाडायविंग कीटसह रेस्क्यु टीम एका तासात घटनास्थळावर पोहचली पुन्हा सर्च ऑपरेशन चालु करणार तेव्हढ्यात पथकातील अतुल उमाळे यांच्या गळाला मृतदेह लागला. यावेळी घटनास्थळावर तहसीलदार शितल बंडगर,आसेगाव तसेच मंगरुळपीर ठाणेदार सह पोलीस कर्मचारी आणी दस्तापुरचे सरपंच मुकेश मुंजे आणी मंगरूळपीर येथील नातेवाईक मोठ्याप्रमाणात हजर होते. यासह उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव आणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत हे सुध्दा घटनास्थळावर हजर होते.अथक परिश्रमानंतर बचाव पथकाच्या टिमने मृतदेह पाण्यातुन शोधुन काढला.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206