वाशिम:-साजरी होत असलेल्या आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी, भाविक विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला रवाना झाले आहेत. विठुराया अन् आषाढीचे महत्त्व शहर परिसरातील शाळांमधील चिमुकल्यांनाही समजावे, या उद्देशाने मंगळवार दि.१६ जुलै रोजी मंगरुळपीर येथील वाय सी प्री प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये आषाढी एकादशी साजरी करण्यात आली.यावेळी वृक्षदिंडी, रिंगण असे अनेक उपक्रम यावेळी राबविण्यात आले. चिमुकल्यांनी विठुनामाचा जयघोष करीत त्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शाळेच्या पटांगणात ज्ञानोबा-माऊलींच्या गजरात विलोभनीय दिंडी सोहळा साजरा करण्यात आला.दिडशेपेक्षा जास्त विद्यार्थी या सोहळ्यात सहभागी झाले होते. सोहळ्याची सुरुवात टाळमृदुंगाच्या गजरातील भजनाने करण्यात आली. वेगवेगळ्या अभंगांवर चिमुकल्या वारकऱ्यांनी ताल धरला होता. शाळेच्या शिक्षकवृंदाने फेर धरून, फुगड्या खेळून कार्यक्रमात रंगत निर्माण केली.चिमुकल्या मुलामुलींनीही फुगड्या खेळत आनंद व्यक्त केला. या सोहळ्याचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे ‘रिंगण’,वृक्षदिंडी हे होते.विद्यार्थी भगवा झेंडा हाती घेऊन यात सामील झाले होते, तर विद्यार्थिनी डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन सहभागी झाल्या होत्या. पावसाच्या रिमझिम सरींतला हा सोहळा पाण्यासाठी पालकवर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता.शाळेतर्फे वृक्षदिंडी काढण्यात आली. विठ्ठल-रखूमाई, वारकऱ्यांच्या वेशभूषेतील विद्यार्थ्यांनी हाती टाळ घेत चंद्रभागेच्या तिरी, पाऊले चालती, विठ्ठलनामाची शाळा भरली… यांसारखी गीते व भजने विद्यार्थ्यांनी सादर केली.सुरुवातीला स्वागतगीत सादर केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.शिक्षवृंद यांनी आषाढी एकादशीची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.
झाडे लावा, झाडे जगवा, वृक्ष लावा,जीवन मिळवा अशा चिमुकल्यांनी दिल्या घोषणा
शाळेतील विद्यार्थ्यांनी वृक्षमहतीच्या विविध घोषणा देत वृक्षदिंडीतून चिमुकल्यांनी नागरिकांना झाडांचे महत्त्व पटवून दिले.विठ्ठलाचा जयघोष करीत अन अभंग,विठ्ठल-रखूमाई,वारकरी अशा वेशभूषेतील विद्यार्थी दिंडीत सहभागी झाले होते. हातातील टाळ-चिपळ्यांचा गजर, मुखी विठ्ठलनाम यामुळे वातावरणात चैतन्य निर्माण झाले होते.शेवटी पसायदानाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.या सामाजीक ऊपक्रमाच्या कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक दानिश मोहन,निलेश पाटील,मिरज भुरीवाले,वैशाली गावंडे,रोशनी राऊत,निता नरळे,शितल मुळे,अश्वीनी गायकवाड,प्रतिमा शेरेकर यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचार्यांनी मोलाचे योगदान दिले.
प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206