सचिन बिद्री:उमरगा

उमरगा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल मध्ये 21 जून रोजी जागतिक योग दिन हा महिला सक्षमीकरणासाठी योग ही थीम घेऊन उत्साहात साजरा करण्यात आला .यावेळी योग शिक्षक बलभीम चव्हाण यांनी प्रशालेतील विद्यार्थी व शिक्षकांकडून योगासन पूर्व हालचाली उभे राहून योगासने.बसून पाठीवर व पोटावरील विविध योगासने व प्राणायमाचे प्रात्यक्षिके करून मोलाचे योगदान दिले प्रशालेचे मुख्याध्यापक पद्माकर मोरे यांनी योगाचे व प्राणायामाचे महत्व विषद केले.

प्रशालेतील,बशीर शेख धनराज तेलंग.संजय रूपाजी, सरिता उपासे, सोनाली मुसळे, शिल्पा चंदनशिवे, ममता गायकवाड उपस्थित होते . प्रशालेतील सेविका सुनिता राठोड व वनमाला वाले यांनी परिश्रम घेतले. प्रशालेतील विद्यार्थी शिक्षक व पालक मोठ्या संख्येने योग दिन साजरा करण्यासाठी उपस्थित होते सरिता उपासे यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर शिल्पा चंदनशिवे यांनी आभार मानले.