कट्टा हा दहा हजार रूपएचा होता
पोलिस विभागाची उत्तम कामगिरी
सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे देशी कट्टा जवळ बाळगणाऱ्या आरोपीस खापरखेडा पोलिसांनी तात्काल अटक केले. ही कारवाई काल शुक्रवारी सकाळच्या सुमारास यशस्वी करण्यात आली. उमाकांत उर्फ राजू भैय्यालाल निषाद (३६), रा. वॉर्ड क्र. ४, चनकापूर असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार खापरखेडा डीबी पथकाला पेट्रोलिंग दरम्यान खबऱ्या कडून माहिती मिळाली की, चनकापूर
कॉलनी वॉर्ड क्र. ४ येथे राहणार
एका इसमाकडे देसी कट्टा आहे. या
माहितीच्या आधारे डीबी पथकाने
सदर आरोपीच्या घरी धाड घालून
त्याला ताब्यात घेतले. दरम्यान
पोलिसी खाक्या दाखविताच तो
पोपटासारखा बोलू लागला. घराच्या मागील झाडीझुडपात लपवून ठेवलेला देशी कट्टा किंमत १०,००० रुपये पोलिसांनी ताब्यात घेतला. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, उपविभागीय पोलीस अधीक्षक संतोष गायकवाड मार्गदर्शना खाली यांचे ठाणेदार धनाजी जळक, पो. ऊ खोब्रागडे,डिबी पथकातील प्रफुल राठोड, शैलेश यादव, मुकेश वाघाडे, कविता गोंडाने, राजू भोयर,राजकुमार सातूर यांच्या पथकाने यशस्वी केली.
(उपसंपादक मंगेश बी उराडे नागपुर जिल्हा)