आटो चालक हा आटो घेवून केलवद चा दिशेने एमपी कड़े जात होता
बाईक चालक हा विरुद्ध दिशेने आल्या मुड़े झाला अपघात
सावनेर तालुक्यातील परसोडी फाटा जवल भीषण अपघात झाला दुचाकी चालकाने ऑटोला जोरदार धडक दिल्याने यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना शुक्रवारी दुपारी एक ते दोनच्या सुमारास घडली.
मध्यप्रदेशातील कबर पिपळा
येथे दोन प्रवासी घेऊन ऑटो जात
असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या
दुचाकीने धडक दिली.

यात दुचाकी
चालक सीताराम धुर्वे (वय ३०)
रा. अमरवाडा, जि. छिंदवाडा, तसेच
ऑटोचालक हेमंत भैय्यालाल रुषीया
( वय ५६) रा. सावनेर (पहलेपार)
या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर
ऑटोतील महिला प्रवासी संगीता
शिवशंकर निमकर (वय ४२) रा.
उमरी, ता. सावनेर, शंकुतला काटोले
(वय ७५) रा. कबर पिपळा, ता
सौंसर (म.प्र) गंभीर जखमी झाल्या.
जखमींना नागपूर येथील शासकीय
रुग्णालयात पाठविण्यात आले.
तर मृतांचे शवविच्छेदन सावनेर
येथे करण्यात आले. याप्रकरणी
पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून
तपास सुरू आहे.
प्रतिनिधि मंगेश उराडे नागपुर