मुख्याधिकारी साहेबांनी दिले आश्वासन येत्या एक ते दीड महिन्यात रोड व नाली च्या बांधकामाला सुरुवात होणार

चंद्रपूर : मुल शहरातील वॉर्ड क्र. 15, प्रभाग क्र.8 मधील नाल्या आणि रोडचे तात्काळ बांधकाम करण्यात यावे.मुल शहरात रोड व नालीचे बांधकाम मंजूर असून काही बांधकाम वॉर्ड आणि प्रभागात सुरू आहे. पण मागील कित्येक वर्षापासून वॉर्ड क्रमांक -15, प्रभाग क्रमांक – 8 मधेच नाली आणि रोडचे बांधकाम का होत नाही आहे. हा खूप मोठा प्रश्न निर्माण झालाआहे. मागील कित्येक वर्षांपासून वॉर्ड क्र.15 प्रभाग क्रमांक 8 येथे नाली आणि रोडचे काम झालेले नाही रोड नसल्या इथून नागरिकांसमाेर येण्या जाण्याकरीता त्रास होत आहे. सांडपाणी वाहुन नेणाऱ्या नाल्या नसल्यामुळे स्थानिक नागरिकांना खूप नाहक त्रास सहन करावा लागत आहे.रोड व नाली नसल्यामुळे परीसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून डेंगु मलेरीया या सारख्या रोगाची साथ वालू असल्यामुळे लोकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊन रोगामुळे जिवित हाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन समस्याचे तात्काळ निवारण करावे. येत्या एक ते दीड महिन्यात नाली वर रोड चें बांधकाम झाले नाही तर नगरपालिका समोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदन मार्फत देण्यात आला. निवेदन देताना निखिल वाढई, प्रणित पाल, आकाश येसनकर, सुरज गेडाम, निहाल गेडाम,विलास देशमुख,प्रकाश देशमुख,अरुण देशमुख,महेश रेड्डीवार,संजय बुचेवर,महेश मेश्राम,नंदू मेर्तीवर,आशिष मिसार,दिवाकर मारेवर,संतोष खंडाळे,नंदा देशमुख, मोनी रेड्डीवार,अनिता बुचेवर,चंद्रकला शेंडे,वंधना आणोरकर,समता चणे,गया बाई खोब्रागडे,सविता गुज्जनावर,पुष्पा तसलवार,इंदिरा मोहुर्ले,बेबीताई कांबळे,रेजा पोहणकर,प्रेमीला मिसार,वैशाली भडके,रूपा कोल्ले,वनिता रामेलवर,आशिया पठाण,सौ व्हायले,व्हायडे,वंदना भडके, असंख्य स्थानिक नागरिक उपस्तिथ होते.