मंगरुळपीर येथील घटना
फुलचंद भगत
वाशिम:-पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथक शाखा मंगरूळपीरच्या जवानांनी मोठ्या अथक प्रयत्नानंतर आज अखेर 20 फुट खोल पाण्यात तळाशी असलेला व गाळात फसलेला मृतदेह शोधून वर आणलाच.
वाशिम जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस मॅडम यांचा मोबाईल आदेश आणी निवासी उप-जिल्हाधीकारी विश्वनाथ घुगे सर यांचा लेखी आदेशानुसार आजचे मोठे सर्च ऑपरेशन दीलेल्या वेळात यशस्वी केले.वाशिम जिल्हा मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथील मारोती नारायण डाखोरे अंदाजे वय (36) वर्ष हे 24 जुलै रोजी सायंकाळी 6;00 वाजताच्या सुमारास गावा शेजारील नाल्याला अचानक आलेल्या पुरात मारोती डाखोरे वाहुन गेले यावेळी माहीती मिळताच मंगरूळपीर तहसीलदार शितल बंडगर मॅडम यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशन चे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे यांना माहीती देऊन तात्काळ सर्च ऑपरेशन करीता पाचारण केले लगेचच मंगरूळपीर शाखेची टीम तहसीलदार मॅडम सोबत घटनास्थळी रवाना केली तेव्हा उशिरापर्यंत शोध घेतला असता काहीच मिळुन आले नाही नाल्याला प्रवाह जास्त असल्याने ट्रेसींग केले असल्यास मारोती डाखोरे हे पुढे गावा शेजारील तलावात वाहत गेल्याचे दिपक सदाफळे यांनी सांगितले अशी चर्चा उ.वि.अ.राजेंद्र जाधव सर, तहसीलदार शितल बंडगर मॅडम,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहु भगत साहेब यांचे सोबत केली आणी दुस-या दिवशी सकाळीच 7:00 सर्च ऑपरेशन चालु करणार असे सांगीतले,ठरल्या आज सकाळीच 7:00 वाजताच मंगरूळपीर शाखा पथाकाचे अतुल उमाळे,गोपाल गीरे, तेजस ऊमाळे,राम भोपळे, शिवा अडात,दत्ता मानेकर, पंकज जटाळे,ऋषिकेश मांगाडे,शुभम भोपळे,प्रदीप बुधे,यांना शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळावर रवाना केले तहसीलदार शितल बंडगर मॅडम यांच्या आदेशानुसार वाहुन गेलेल्या ठिकाणावरून सर्च ऑपरेशन चालु केले असता शेवटी तलावात अथक प्रयत्नांनंतर आज सकाळी 8:30 वाजता 20 फुट खोल पाण्यातील खाली तळाशी गाळात असलेला मृतदेह शोधून वर आणत बाहेर आनुण दीला यावेळी सतत उ.वि.अ.राजेंद्र जाधव सर,तहसीलदार शितल बंडगर मॅडम,जि.आ.व्य.अ. शाहु भगत साहेब वरचेवर संपर्क साधुन होते. घटनास्थळावर मा.सरपंच मंगेश निळकंठ,पो.पा.सतीश क्षीरसागर,तं.मु.अ.ज्ञानेश्वर हीमगीरे, तसेच गावातील नागरिकांसह नातेवाईक हजर होते.अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दीली आहे.