गडचिरोली ; दि.30 सप्टेंबर :
चामोर्शी तालुक्यातील आष्टी परिसरात कापूस. धान. सोयाबीनसह ईतर पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते पण आष्टी परिसर हे जंगल व्याप्त असल्याने या घनदाट जंगलात बिबट. हरीण.चितळ. रानडुकर यासारखे अशे अनेक प्राण्यांचा वावर आहे आता कापूस पिकाला बोंडे लागले आहेत व हलक्या जातीचे धान पूर्ण निस्वा झाला आहे पण रानटी डुक्कर धुमाकूळ घातल्याने आष्टी परिसरातील शेतकऱ्यांचे रानटी डुकरे मोठया प्रमाणात नुकसान करीत आहेत

शेतकरी वनविभागाकडे तक्रार करून नुकसान भरपाईची मागणी करीत आहे परंतु वनविभागाकडून चौकशी करून नुकसान भरपाई मिळे पर्यंत हाती आलेला पिक डुकराला दान करण्याची वेळ आष्टी परिसरातील शेतकऱ्यावर आली आहे करिता आष्टी परिसरातील शेतकऱ्यांना वनविभागाने रानटी डुकराला उपद्रवी प्राणी म्हणून घोषित करावे तात्काळ नुकसान भरपाई देऊन रानडूकराचा बंदोबस्त करावे अशी मागणी आष्टी ईलूर जिल्हा परिषद क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या रूपाली पंदिलवार व काँग्रेस सरचिटणीस गडचिरोली व सामाजिक कार्यकर्ता श्री संजय भाऊ पंदिलवार यांनी केली आहे
भास्कर फरकडे (प्रतिनिधी)
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली