
जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 146 वि जयंती गोटूल समितीमार्कंडा कंसोबाच्या वतीने आज दिनांक 15 नोव्हेंबर सोमवारला येथील गोटूल भवनाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा, व क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन आष्टीचे माजी सरपंच शिवसेना उपजिल्हाप्रमुख राकेश बेलसरे यांनी केले. व उपस्थित मातृशक्ती व पितृशक्ती यांना मार्गदर्शन करताना बिरसा मुंडा यांनी जल, जंगल जमिनीच्या रक्षणासाठी ब्रिटिशाविरुद्ध संघर्ष केला. आदिवासी बांधवांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करावे असे सांगितले, आदिवासी समाजाची संस्कृती ही प्रगल्भ असून समाजाने संघटित होऊन शिक्षणाद्वारे मोठे ध्येय गाठावे असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
तसेच यावेळी संजय भोयर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. मार्कंडा कंसोबा येथील ग्रामपंचायत सदस्य नंदू भाऊ सिडाम यांनीसुद्धा समाजबांधवानी संघटित होण्याची गरज आहे असे सांगून क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन पुढे वाटचाल करायची आहे असे आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगितले. यावेळी आष्टी ग्रामपंचायतीचे सदस्य छोटू दुर्गे यांची प्रमुख उपस्थिती होती. किशोर तोरे सर यांनी कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन केले. यावेळी प्रसाद पा.कुमरे ,अरविंद शेडमाके ,विजू तोरे, राजू नैताम, राजू आत्राम, बंडू आत्राम ,संजय टेकाम, दिलीप आत्राम,राकेश तोरे, दिगंबर आत्राम, गंगाराम आलाम, रावजी वेलादी, गुलाबराव शेडमाके, सखाराम पेंदाम, सुधाकर मडावी, सचिन पेंद्राम, स्वप्नील वेलादी, संतोष आलाम,ताराबाई शेडमाके, किरण आत्राम , वर्षा गावडे, प्रेमीला टेकाम, विमलाबाई वेलादी, संगीता शेडमाके, गीता आलाम, सुनंदा नैताम यशोदा तोरे उषा सोयाम, मनीषा मडावी,मीराबाई आलाम,व पितृशक्ती व मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली