
जननायक क्रांतिवीर बिरसा मुंडा यांची 146 वि जयंती गोटूल समिती ईलूर च्या वतीने आज दिनांक 15 नोव्हेंबर सोमवारला येथील गोटूल भवनाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी क्रांतिवीर बिरसा मुंडा, व क्रांतिवीर वीर बाबुराव शेडमाके यांच्या यांच्या प्रतिमेचे पूजन आष्टीचे सामाजीक कार्यकर्ता व काँग्रेस सरचिटणीस गडचिरोली संजयराव पंदिलवार यांनी केले. व उपस्थित मातृशक्ती व पितृशक्ती यांना मार्गदर्शन करताना बिरसा मुंडा यांनी जल, जंगल जमिनीच्या रक्षणासाठी ब्रिटिशाविरुद्ध संघर्ष केला. आदिवासी बांधवांनी क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजाच्या उत्थानासाठी कार्य करावे असे सांगितले, आदिवासी समाजाची संस्कृती ही प्रगल्भ असून समाजाने संघटित होऊन शिक्षणाद्वारे मोठे ध्येय गाठावे असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
तसेच.यावेळी रामचंद्र बामणकार उपसरपंच
,व पितृशक्ती व मातृशक्ती मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली