बीड जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या नगर-बीड-परळी रेल्वे मार्गाचा आणखी एक टप्पा पूर्ण झाला आहे. ताशी १३० किलोमीटर वेगाने अमळनेर ते विघनवाडी अंतराची चाचणी नुकतीच घेण्यात आली. त्यामुळे विघनवाडी ग्रामस्थांकडून स्वागत करण्यात आले.

नगर ते बीडपर्यंत लोहमार्गचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. ९५ किलोमीटर अंतराची चाचणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवाशांचा प्रवास सोपा व सुखकर होणार असल्याचे उपमुख्य अभियंता बांधकाम राकेशकुमार यादव यांनी सांगितले. यावेळी रेल्वे सुरक्षा आयुक्त मनोज अरोरा, मुख्य प्राशकीय अधिकारी ए. के. पांडे आदी उपस्थित होते. या सर्व लोहमार्गामध्ये डिझेल इंजिनचा वापर करण्यात आला आहे. तसेच या महत्त्वकांक्षी रेल्वे मार्गामध्ये अनेक मोठे पूल बांधण्यात आले आहेत. दरम्यान, हा प्रकल्प पूर्ण होण्यास एक वर्ष कालावधी लागू शकतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
