बदलापुरातील एका नामांकित शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर शाळेतील कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. साधारण आठवडाभराने हा प्रकार उजेडात आला आहे. यानंतर पोलीस, प्रशासन खडबडून जागे झाले असून आरोपींवर कडक कारवाई केली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. राज्यातील शाळांमध्ये अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी शालेय शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळांमध्ये तक्रार पेटी ठेवण्यात येणार आहे, असे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.

शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांनी शालेय शिक्षण विभागाची तत्काळ बैठक घेतली आहे. केसरकर म्हणाले, ”पोस्को अंतर्गत ई बॉक्स संकल्पना राबवण्यात येत आहे. त्यासोबत तक्रार पेटीही ठेवायला हवी. त्यातील तक्रारींवर तत्काळ कारवाई व्हायला हवी, अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातील. यासंदर्भात आजच अधिसूचना काढू, असे केसरकर म्हणाले.
