धनगर समाजाकडून आमदार चौगुले यांचा सत्कार

(सचिन बिद्री:धाराशिव)

मौजे.कोथळी ता.उमरगा येथे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या प्रयत्नातून मंजूर झालेल्या बिरुदेव मंदीर परिसर विकसित व पोहोच मार्ग करणे 35 लक्ष रुपये या कामाचे आमदार ज्ञानराज चौगुले यांच्या हस्ते व युवासेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड, जिल्हाप्रमुख मोहन पणुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत भूमिपूजन संपन्न झाले.
आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मौजे.कोथळी येथील कोथळी कंटेकुर रस्त्यावर पूल बांधकाम करणे 2.25 कोटी, कोथळी ते केसाजवळगा रस्ता सुधारणा करणे 50 लक्ष, कोथळी ते शिरूर रस्त्यावर पूल बांधकाम करणे 10 लक्ष, 2515 योजनेतून गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे 20 लक्ष, तांडा वस्ती सुधार योजनेतून गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष, कोथळी ते शिरूर रस्ता करणे 25 लक्ष, बिरदेव मंदिर परिसर विकास व पोहोच रस्ता करणे 35 लक्ष, जि.प.प्रा.शाळा, दुरुस्ती करणे 10 लक्ष,जि.प.प्रा.शाळा, लमाण तांडा दुरुस्ती करणे 05 लक्ष, जि.प.प्रा.शाळा कोथळी येथे 01 वर्ग खोली बांधकाम करणे 12.75 लक्ष, कल्लेश्वर देवस्थान येथील परिसर विकसित करणे 10 लक्ष, 2225 योजनेतून मागासवर्गीय वस्तीत सिमेंट रस्ता करणे 10 लक्ष, 95/5 योजनेतून गावांतर्गत सिमेंट रस्ता करणे २० लक्ष, जि.प.स्तर दलीत वस्ती योजनेतून मागासवर्गीय वस्तीत रस्ते/नाली करणे 50 लक्ष, लिंबाळे गल्लीत काँक्रीट गटर करणे 04 लक्ष, 22 15 योजनेतून लोहिया प्लॉटिंगमध्ये सिमेंट रस्ता करणे 30 लक्ष आदी कामांसाठी एकूण 05 कोटी 26 लक्ष रुपये निधी मंजूर केला आहे.
भूमिपूजनानंतर बिरूदेव मंदिरास निधी मंजूर केल्याबद्दल धनगर समाजामार्फत सत्कार व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अनुदान प्राप्त महिलांनी आमदार ज्ञानराज चौगुले यांचे शासनाचे प्रतिनिधी या नात्याने राख्या बांधत आभार व्यक्त केले तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरून महिलांना अनुदान मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतलेल्या अंगणवाडी कर्मचारी व शिवसैनिक यांचा आमदार ज्ञानराज चौगुले व युवा सेना मराठवाडा निरीक्षक किरण गायकवाड यांच्याकडून सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात आमदार चौगुले यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अनुदान रक्षाबंधनाच्या आधी देण्यात आल्याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, दोन्हीं उपमुख्यमंत्री व सर्व मंत्रिमंडळाचे आभार व्यक्त केले.
महाराष्ट्र शासनाकडून मुलींना व्यवसायिक मोफत शिक्षण , तीर्थक्षेत्र दर्शन योजना, मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ योजना, 7.5 एच.पी. पर्यंत शेतकऱ्यांना वीज बिल माफ या योजना सुरु करण्यात आले असल्याचे सांगत विरोधकाकडून या योजना फसव्या, ठराविक वेळेच्या असल्याच्या अफवा पसरवल्या जात असल्याचे सांगत. त्या अफवांवर विश्वास न ठेवता मतदारसंघातील जनतेने या योजनांचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा असे आव्हान यावेळी केले. त्यांच्या प्रयत्नातून मतदारसंघात झालेल्या मोठ्या विकास कामांच्या जोरावर पुढल्या काळातही तेच आमदार राहतील असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना देत मतदारसंघातील विकास कामांसाठी मी बांधील असल्याचे यावेळी सांगितले.
यावेळी युवती सेना मराठवाडा निरीक्षक आकांक्षा चौगुले, उमरगा तालुकाप्रमुख बळीराम सुरवसे, लोहारा तालुकाप्रमुख जगन्नाथ पाटील, शेखर मुदकन्ना, शिवशरण वरनाळे, उपतालुकाप्रमुख व्यंकट पाटील, शेखर पाटील, माजी सरपंच आप्पासाहेब पाटील, उपसरपंच बाबासाहेब पाटील, उमरगा शहरप्रमुख योगेश तपसाळे, संघटक शरद पवार, विद्यार्थीसेना तालुकाप्रमुख संदीप चौगुले, शिवानंद तुगावे, गिरीश पाटील, राजू कारभारी, प्रदीप कारभारी, महंतया स्वामी, परमेश्वर बोरे, मधुकर सुरवसे, शरणू कांबळे, पोमा चव्हाण शशिकांत गावडे, गुंडू बंडगर मल्लिनाथ गावडे, गिरीश मंडले, पप्पू समन, जागृत शिंदे, केसरजवळगा सरपंच अमोल पटवारी, श्रावण इंगळे, उत्तम इंगळे, मशाक मुजावर, शिवसैनिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *