सचिन बिद्री:उमरगा
दि 19 ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांचे सन 2023-24 चे अनुदान वाटप करण्यासाठी शासनाने ई पीक पाहणीची जाचक अट ठेवल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक शेतकरी ई पीक पाहणी करू न शकल्यामुळे अनुदानापासून वंचित राहत आहेत व कोलकत्ता येथे डॉ महिला यांच्यावर बलात्कार करून निर्घृण हत्या करण्यात आली त्या आरोपींना तत्काळ कठोर कार्यवाही करून शिक्षा करावी असे धाराशिव जिल्हा युवक काँग्रेस चे अध्यक्ष अश्लेष भैया शिवाजीराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने उमरगा येथे तहसीलदारामार्फत जिल्हाधिकारी यांना व पो.नि. उमरगा यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष विजय दळगडे,मा. नगरसेवक विजय वाघमारे, बाबा मस्के, अश्लेष भैया शिवाजीराव मोरे मित्रमंडळाचे अध्यक्ष विशाल काणेकर,जिल्हा युवक काँग्रेस उपाध्यक्ष दादा गायकवाड,युवक काँग्रेस तालुका उपाध्यक्ष प्रफुल्ल गायकवाड, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष सोहेल इनामदार,प्रकाश चव्हाण,अप्पा कारभारी, युवक काँग्रेस चे प्रवक्ते अमित रेड्डी,अभंग शिंदे, संगमेश मंठाळकर,वैभव मोरे,गणेश सूर्यवंशी,गणेश वाघमोडे,संदीप माने,जयंत काळे,आकाश सूर्यवंशी यांच्यासह युवक काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते