फुलचंद भगत
वाशिम:-दिनांक २४/०८/२०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, वाशिम येथील पथकास गोपनीय माहिती मिळाली की वाशिम हिंगोली रोडवर पंचाळा फाटा जवळ एक एक संशीयीत इसम गावठी पिस्टल बाळगुन आहे अशी माहिती मिळाल्यावरून सदर माहितीची खात्री करून त्या आधारे वाशिम ते हिंगोली रोडवर पंचाळा फाटा, आयुष होटेल समोर १२:३० वा. जावुन स्थानिक गुन्हे शाखा वाशिम च्या पथकाने इसम नामे शेख सलमान उर्फ लाला शेख हुसेन वय २१ वर्ष रा. शेर का दर्गा वाशिम हा पोलीस आल्याची चाहुल लागताच पळुन जाण्याचा प्रयत्न करत असतानां त्याच्याबाबत संशय आल्याने त्यास ताब्यात घेवुन त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या ताब्यातुन एक देशी बनावटीची पिस्टल मॅगझीनसह व दोन राउंड जप्त करण्यात आले सदर इसमा विरूध्द भारतीय हत्यार कायदा १९५९ नुसार पोलीस स्टेशन वाशिम ग्रामिण येथे गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सदरची कार्यावाही ही पोलीस अधीक्षक मा. श्री. अनुज तारे. अपर पोलीस अधीक्षक श्री. भारत तांगडे पोलीस निरीक्षक श्री. रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि योगेश धोत्रे पोहेकॉ प्रशांत राजगुरू नापोकॉ ज्ञानदेव मात्रे पोकॉ विठ्ठल महले, दिपक घुगे, अमोल इरतकर स्थागुशा यांच्या पथकाने पार पाडली. अश्या प्रकारच्या संशयापद हालचाली लक्ष्यात आल्यास नागरिकानी पोलीस प्रशासनास कळवावे असे अहवान पोलीस अधिक्षक वाशिम श्री. अनुज तारे यांनी केले आहे.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206