वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये पारंपारीक ऊत्सवाला दिली चालना

फुलचंद भगत
वाशिम:-मंगरुळपीर येथील स्थानिक वाय सी प्रि प्रायमरी इंग्लीश स्कुलमध्ये पारंपारीक सण ऊत्सव साजरा करुन चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या मनात भारतीय संस्कृतीविषयी आस्था निर्माण होवुन भारतीय परंपरांची रुजवणुक व्हावी या दृष्टीकोणातुन दि.२७ आॅगष्ट रोजी भगवान कृष्ण,राधा आणी गोपीकांची वेशभुषा केलेल्या विद्यार्थ्यांनी रंगीबेरंगी पोशाख परिधान करुन कृष्णजन्माष्ठमी मोठ्या ऊत्साहात साजरी करुन दहिहंडी फोडण्याचाही कार्यक्रम घेण्यात आला.


चिमुकल्या विद्यार्थ्यांना विविध सण ऊत्सव व भारतीय परंपरा माहीत व्हाव्यात आणी त्या परंपरा टिकवण्यासाठी शाळेमध्ये विविध ऊपक्रमाच्या माध्यमातुन दि.२७ आॅगष्ट रोजी कृष्णजन्माष्ठमी मोठ्या ऊत्साहात साजरी करण्यात आली.वाय सी इंग्लीश स्कुलमध्ये ऊत्सवाचा एक भाग म्हणून अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कृष्ण आणि राधाच्या भूमिकेतील मुलांनी प्रेक्षकांसाठी रासलीला सादर केली. उत्सवात मग्न असलेल्या, मुलांना ‘मटकी तोड ‘ सोहळ्यासाठी देखील तयार करण्यात आले होते.त्यानंतर त्यांना सणाचे महत्त्व समजावून सांगण्यात आले आणि देशभरातील लोक एकञ येवुन जन्माष्टमी कशी साजरी करतात हे समजावून सांगण्यात आले.जन्माष्टमी साजरी करताना मुलांनी कृष्ण आणि राधाची वेशभूषा केली होती. लहान कृष्ण आणि राधा त्यांच्या पारंपारिक पोशाखात मोहक दिसत होते. चिमुकल्यांनी मोराच्या पिसांचं हेडगिअर्स, मटकी आणि बासरी कुशलतेने सजवल्या.यावेळी विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, स्किट्स आणि नृत्य सादर केल्याने संपूर्ण परिसर आनंद, उत्सव आणि आनंदाच्या भूमीत बदलला होता. हा उत्सव भक्तिमय आणि मंत्रमुग्ध करणारा होता.आमच्या मुलांच्या आनंदी चेहऱ्यांमुळे सण आणखीनच आनंदी झाला.या श्रीकृष्णजन्माष्ठमी सणाच्या ऊपक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक धानिष मोहन,निलेश पाटील,मिराज भुरीवाले,वैशाली गावंडे,रोशनी राऊत,निता नरळे,शितल मुळे,खडसे,प्रतिमा शेरेकर,चाॅद गारवे,शितल जमजारे यांचेसह शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी मोलाचे योगदान दिले.

प्रतिनीधी:-फुलचंद भगत
मंगरुळपीर/वाशिम
मो.8459273206

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *