छ्त्रपती संभाजीनगर:- राज्यातील मातंग समाज हा राजकारणामध्ये दखलपात्र होत असल्याचे प्रतिपादन साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे युवा मंचचे अध्यक्ष डॉ .सचिन साबळे यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये सांगितले आहे. प्रसिद्धी पत्रकात पुढे म्हटले आहे की,
महाराष्ट्र राज्यासह देशभरात अनुसूचित जातीतील अती उपेक्षित असलेला मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक ,सांस्कृतिक, आर्थिक तथा राजकीय क्षेत्रामध्ये कुठल्या ही प्रकारची प्रगती देश स्वतंत्र झाल्या नंतर च्या 75 वर्षात ही झाली नसल्यामुळे समाज परिवर्तनाचा महत्वाचा घटक असलेल्या राजकारणात महत्वाचे स्थान समाजाला कधीच मिळाले नाही. त्यामुळे मातंग समाज सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, आर्थिक व राजकीय क्षेत्रातील प्रगती पासून कोसो दूर राहून गेला किंबहुना काही स्वार्थी सामाजिक व राजकीय घटकांनी समाजाला पुढे येण्याची संधीच मिळू दिली नसल्याने समाजाची सर्वांगीण प्रगती झाली नाही.
आजही एकविसाव्या शतकामध्ये अनुसूचित जातीतील मातंग समाजाला विकासाच्या सर्वांगीण प्रवाहामध्ये आणण्यासाठी अनेक अडी अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तसे पाहिले तर समाजाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शैक्षणिक क्रांती देखील तितकीच महत्त्वाची असून अन्न वस्त्र निवारा प्रमाणे शिक्षण देखील सर्वांगीण विकास होण्यासाठी प्रचंड गरजेचे आहे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे एकंदरीत पाहिले तर स्वतंत्र मिळाल्यापासून ते आज मिती पर्यंत देशातील सर्व पक्षीय राजकारण्यांनी अनुसूचित जातीतील मातंग समाजाला राजकारणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी कधी ही ठोस पावले उचलले नाही किंबहुना मातंग समाज राजकारणात आला तर त्याचा विकास होईल या भीती पोटी काही घटकांनी राजकारण हे गोर गरीबांचे नाही, लहान लहान समाजाचे नाही , राजकारणात मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो अशा व इतर काही प्रकारच्या भीती दाखवून पद्धतशीरपने समाजाला राजकारण करण्यापासून रोखून धरले किबहूना मन दुसरीकडे वळविले. त्यामुळे मातंग समाजाचे नागरिक राजकारणापासून कोसो दूर राहून गेले. राजकारण्यांनी मातंग समाजाचा फक्त राजकारणासाठीच मताचा वापर केला आजही एकविसाव्या शतकामध्ये राजकारण्यांनी मातंग समाजाच्या पुढार्यांना हवी तशी संधी दिली नाही परंतु यामुळे मातंग समाजाचा राजकारणामध्ये फारसी प्रगती गल्ली पासून ते थेट दिल्लीपर्यंत झाली नसल्यामुळे विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये समाजाची प्रगती झालेली नाही, यामुळे मातंग समाज सामाजिक शैक्षणिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये आज रोजी ही अनेक शहरासह खेड्यापाड्यांमध्ये आर्थिक प्रगती झाली नाही, नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचना स्पस्ट बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जवळपास सर्वच राजकीय पक्षां मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचाच परिणाम म्हणून भाजपाला अनुसूचित जातीतील मातंग समाजाचे भारतीय जनता पक्षचे राजकारणात अखंडपने सक्रिय असलेले पुणे पिंपरी चिंचवड येथील मातंग समाजाचे युवा नेते श्री अमित गोरखे यांना देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली जाहीरही केली आणि निवडून देखील आणले हे मात्र विशेष .
मातंग समाजाचे येणाऱ्या निवडणुकीसाठी एक गठ्ठा मतदान भारतीय जनता पक्षाला मिळेल या अपेक्षेने इतिहासामध्ये पहिल्यांदाच श्री अमित गोरखे यांना आमदारकी देऊन भाजपाचे वरिष्ठ नेते तथा उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांनी एक प्रकारे चांगला निर्णय घेतलेला असून ते राज्यातील मातंग समाजाच्या वतीने भाजपाचे राज्यभर मनपूर्वक आभार मानण्यात येत आहे. देशाच्या,राज्याच्या राजकारणात मातंग समाजाला अमित गोरखे यांना विधान परिषदेमध्ये संधी मिळाल्याने राज्यातील मातंग समाजात मोठे उत्साहाचे व चैतन्याचे वातावरण तयार झाले आहे. मागील 15 वर्षा पूर्वीची काँग्रेस व घटक पक्षाच्या सरकारने मध्ये मातंग समाजाचे एक दोन पुढारी तत्कालीन मंत्रीमंडळात होते. त्या नंतर आज मिती पर्यंत कुठल्या ही राजकीय पक्षाने मातंग समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस पावले उचलले नव्हते. मात्र गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला मोठ्या प्रमाणात मताचे नुकसान झाल्याने अनु सूचित जातीतील मातंग समाजाच्या विविध सामाजिक प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न भाजपाच्या वतीने करण्यात येत आहे. देशाच्या एकूण राजकारणात मातंग समाज हा अती वंचित असल्याची बाब हेरून भारतीय जनता पक्षाच्या वतीने समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी दृष्टीने नवीन संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
श्री अमित गोरखे यांनी आमदारकीची शपथ घेतल्यानंतर तीन ऑगस्ट पासून राज्यात बहुजन संवाद यात्रा सुरू केली असून राज्यातील मातंग समाजाच्या वाडीवस्ती मध्ये जाऊन सामाजिक, शैक्षणिक सांस्कृतिक, आर्थिक व राजकीय स्थानिक प्रश्न जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे या यात्रेला राज्यातील समाजाच्या वतीने प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. याचा एक प्रकारे धसका घेऊन कालच अखिल भारतीय काँग्रेस पक्षाने मातंग समाजाचे नेते असलेले देशामध्ये पक्षात विविध पदे भूषवलेले नेते श्री रवींद्र दळवी यांना अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आले असून नेते श्री रविंद्र दळवी हे देशभरामध्ये विविध राज्याचे काँग्रेस पक्ष अनुसूचित जाती विभागाचे प्रभारी म्हणून तसेच विविध पक्षाचे पद त्यांनी भूषवलेले असून त्यांची अखिल भारतीय काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. आमदार श्री अमितजी गोरखे, तसेच श्री नेते रवींद्रजी दळवी यांची निवड झाल्यामुळे राज्यातील मातंग समाजाच्या वतीने पक्षाचे आभार मानण्यात येत असून एकंदरीत वस्तुस्थिती पाहता आत्तापर्यंत मातंग समाजाचा सर्व राजकीय पक्षांनी फक्त मतासाठीच वापर केलेला आहे आणि आता विविध देश पातळीवरचे मातंग समाजातील नेत्यांना पदे देऊन राजकारणात महत्वाचे स्थान देण्यात येत आहे. परिणामी राज्यातील मातंग समाज हा राज्याच्या, देशाच्या राजकारणामध्ये दखलपात्र होत असल्याची ही बाब समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सकारात्मक असल्याचे दिसून येत असल्याचे मत
डॉ सचिन साबळे यांनी व्यक्त केले आहे.
प्रतिनिधी रवींद्र खरात.