प्रतिनिधी. मुनीर शेख. परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित न्यू इंग्लिश स्कूल पोफळी संकुलात गणेशोत्सव साजरा करण्यात आला.
ढोल ताशांच्या गजरात श्री गणरायाचे आगमन झाले.शाळेच्या झांजपथकाच्या ठेक्यावर इयत्ता चौथीतील विद्यार्थिनींनी लेझिम खेळत आणखीनच शोभा वाढविली.
मुख्याध्यापक श्री.शरद सोळुंके सर यांच्या हस्ते श्री गणरायाची मूर्ती अत्यंत उत्साहाच्या वातावरणात स्थापन करण्यात आली.श्रींची आरती घेऊन सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक श्री महेंद्र कापडी सर व श्री शरद सोळुंके सर यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाची तयारी शिशुविहारच्या प्रमुख वारे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी केली.तसेच त्यांनी आकर्षक सुशोभीकरण व विद्युत रोषणाई केली होती.
या कार्यक्रमासाठी प्राथमिक,माध्यमिक तसेच शिशुविहारच्या सर्वच शिक्षक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
5 सप्टेंबर डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन् यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून माध्यमिक विभागातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मुख्याध्यापिका म्हणून कु.लकी परळीकर तर उपमुख्याध्यापिका म्हणून कु.रिया जाधव या विद्यार्थिनींनी दिवसभराचे कामकाज पाहिले. अनेक विद्यार्थ्यांनी इयत्ता पहिली पासून ते इयत्ता नववी पर्यंतच्या वर्गाचे दिवसभराचे अध्यापन व्यवस्थित प्रकारे केले. यानंतर शाळेच्या सभागृहात शिक्षक दिनाचा कार्यक्रम विद्यार्थ्यांच्या नियोजनानुसार पार पडला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुतिका शिंदे व आयुष कदम या विद्यार्थ्यांनी केले तसेच प्रास्ताविक लकी परळीकर या विद्यार्थिनीने केले. अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून दिवसभरात आलेले अनुभवांचे कथन केले. शिक्षकांपैकी ताम्हणकर मॅडम मायनाक सर व यादव सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी उपस्थित सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे फुल देऊन स्वागत केले. रिया जाधव या विद्यार्थिनीने सर्वांचे आभार मानले व कार्यक्रमाचे सांगता झाली.