सातारा जिल्ह्यात राजा मानेंचे स्वागत

सातारा,दि.विधानसभा निवडणूक वृत्तांकन आणि मतदार कौल विश्लेषणसंशोधनासाठी विधानसभा मतदारसंघवार नियोजन संघटना करीत असल्याचे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी सांगितले.ते आज साताऱ्यात आले होते. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली.राजा माने यांचे स्वागत सत्कार संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष गणेश बोतालजी यांनी केले. यावेळी लोकमत सातारा आवृत्तीचे युनिट हेड संतोष बोगशेट्टी, विश्वजीत गुजर,माजी प्राचार्य पांडुरंग सातपुते, संघटनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य संजय कदम, जिल्हा उपाध्यक्ष धनंजय पानसांडे, जिल्हा खजिनदार संदीप माने, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष शिराळे, लिंगराज साखरे सूर्यप्रताप कांबळे यांची उपस्थिती होती.