उस्मानाबाद : जिल्ह्यातील भारत शिक्षण संस्था संचलित उमरगा येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातील कला शाखेचे उपप्राचार्य तथा इंग्रजी विभागाचे प्राध्यापक डी. व्ही. थोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथून पीएच. डी. ही शिक्षण क्षेत्रातली मानाची पदवी बहाल करण्यात आली.

प्रा.थोरे यांनी तुळजाभवानी महाविद्यालय,तुळजापूर येथील डॉ. यशवंत डोके यांच्या मार्गदर्शनाखाली “अ क्रिटिकल स्टडी ऑफ इंडियन फिलॉसॉफी इन अरूण जोशिज फिक्शन” या विषयावर विद्यापीठास प्रबंध सादर केला होता. त्यावर डॉ. अमरसिंग, मध्यप्रदेश व शिवाजी महाविद्यालय उदगीर येथील डॉ. अरविंद नवले यांनी सकारात्मक मूल्यांकन अहवाल सादर केल्यानंतर घेण्यात आलेल्या तोंडी परीक्षेच्या अहवालानुसार ही पदवी बहाल करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री अमोल भैय्या मोरे, उपाध्यक्ष श्री आश्लेष भैय्या मोरे, संस्थेचे सर्व सदस्य तसेच प्राचार्य डॉ. घनश्याम जाधव, उपप्राचार्य डॉ. विलास इंगळे, डॉ. संजय अस्वले, रजिस्ट्रार श्री सोनवणे, श्री नितीन कोराळे तसेच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर आदींनी प्रा. डॉ. थोरे यांचे अभिनंदन करीत सोशल मीडियावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सचिन बिद्री:उमरगा, उस्मानाबाद

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *