(सचिन बिद्री :धाराशिव)
एखाद्या सैनिकाचं दुःख केवळ त्याच्या कुटुंबियांचा कळतं, 17 वर्षे देशाची सेवा करून घरी परतल्यावर दैनंदिन जीवन जगताना कोण आपलं आणि कोण परकं असतं हे केवळ अनुभवातून समजतं त्यामुळे सहजासहजी सेवानिवृत्त जवानांनी कोणावर विश्वास न ठेवता आपल्या कष्टाचा पैसे उसने देण्यापासून सावध राहावं असं मत यावेळी सेवानिवृत्ती सोहळ्यात माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष शहाजी चालुक्य यांनी मांडत वन रँक वन पेन्शन मोदीजीमुळे अस्तित्वात आली असे म्हणत देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मादीजींचे आभार मानले.

उमरगा तालुक्यातील मुळ मुळज तांडा येथील रहिवासी असलेले नवनाथ बाबुराव जाधव हे सतरा (17) वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त झाल्या मुळे मुळज ग्रामस्थ व मित्रपरिवाराच्या वतीने छोटेखाणी सत्कार सोहळा उमरगा शहरातील एकोन्डी रोड लागत श्री जाधव यांच्या स्वगृही दि 4 रोजी आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सौनिक पतसंस्था उमरगा आणि धाराशिव भारतीय माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सुभेदार शहाजी चालुक्य हे होते तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमरगा लोहारा विधानसभा क्षेत्राचे नेते बाबा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी सुभेदार बाबुराव शिंदे, लक्ष्मण घायाळ, राम जाधव, सूर्यकांत चौधरी,अशोक सूर्यवंशी आणि माजी सैनिक बहुद्देशीय संस्थेचे सुभेदार तात्याराव तोरंबे, सुभेदार सुभाष काळे, सुभेदार दिगंबर कांबळे, हवालदार बालाजी मद्रे आदी सेवानिवृत्त माजी सानिकांची उपस्थिती होती.जम्मू काश्मीर, दिल्ली, अयोध्या राम मंदिर अश्या विविध ठिकाणी पूर्ण निष्ठेने सतरा वर्षे देशसेवा करून सेवानिवृत्त होऊन आपल्या गावी परतणाऱ्या ए सी पी हवालदार नवनाथ जाधव यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी उमरगा शहरातील व परिसरातील बंजारा समाज, मित्र परिवाराच्या वतीने सेवानिवृत्त सैनिक श्री जाधव यांचा सत्कार करण्यासाठी गर्दी झाल्याचे दिसून आले.