बिडकीन दि ४ ऑक्टोबर पैठण तालुक्यातील बिडकीन पोलीस ठाण्याचे हद्दीतील चितेगाव परिसर मध्ये ३३ वर्षीय तरुणांचा गळफास घेऊन आत्महत्या मिळालेली सविस्तर माहिती अशी की बिडकीन पोलीस ठाण्याचे हद्दीतील चितेगाव परिसरातील शेती गट नंबर २०६ मधील लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने मयत रमेश बबन अंगरख वय ३३ रा चितेगाव ता पैठण याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज दि ४ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ ते १ च्या सुमारेस वाजता आढळून आले

, या घटनेची माहिती मिळताच बिडकीन पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बीट जमादार दिलीप साळवे साहेबराव राठोड, शिवानंद बनगे, घटनास्थळी जाऊन प्रेताला खाली काढून पुढील कारवाईसाठी ग्रामीण रुग्णालय बिडकीन दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ प्रणिता मात्रे यांनी मृत्यू घोषित करुन शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले, रमेश बबन अंगरख हा तीन दिवसापासून घरामधून बेपत्ता असल्याचे नातेवाईकांनी पोलीसांना सांगितले, पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश घुगे, बीट जमादार दिलीप साळवे पुढील तपास करीत आहे
MTV NEWS MARATHI
प्रतिनिधी अलीम शेख बिडकीन छत्रपती संभाजीनगर