भाजपा महिला आघाडीला जामखेडमध्ये खिंडार
भाजप जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई राळेभात यांची भाजपला सोडचिठ्ठी
आ.रोहित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश
जामखेड ता.११- आमदार राम शिंदे यांच्या मनमानी आणि हुकूमशाही कारभाराला कंटाळून भाजप जिल्हा सरचिटणीस अर्चनाताई राळेभात यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत आज कर्जत येथे आमदार रोहित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. यामुळे जामखेडमध्ये भाजपला मोठे खिंडार पडले असून हा आमदार राम शिंदे यांना ऐन निवडणुकीच्या तोंडावर मोठा धक्का मानला जात आहे. “आम्ही आतापर्यंत भाजपमध्ये निष्ठेने काम केले मात्र पक्षामध्ये एकाच माणसाची मनमानी आणि हुकुमशाही कारभार सुरु असून याच पक्षांतर्गंत नाराजीमुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत असल्याचे अर्चनाताई राळेभात यांनी यावेळी म्हटले आहे.”
नंदु परदेशी जिल्हा प्रतिनिधी अहमदनगर
मो नं9765886124