चंद्रपुर (सतीश आकुलवार) अखिल भारतीय विमुक्त जाती भटक्या जमाती वेलफेअर संघ दिल्ली महाराष्ट्र , जिल्हा शाखा चंद्रपूर द्वारे विमुक्त जाती भटक्या जमाती, व ओबीसी समाजाचे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नवीन 72 वसतिगृह मंजूर करून व राज्यातील कोरोना सदृश वातावरण संपले असल्याने राज्यातील सर्वच वसतिगृह तत्काळ सुरू करून मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान थांबिविण्यासाठी तत्काळ वसतिगृह सुरू करावे असे आशयाचे निवेदन मान.नन. श्री, विजय वडेट्टीवार, महाराष्ट्र राज्याचे बहुजन विकास मंत्री यांना आनंदराव अंगलवार यांचे नेतृत्वात व इतर पदाधिकाऱ्यांचे एक शिष्टमंडळ नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर परिसर येथे भेटघेऊन निवेदन देऊन चर्चा केले असता मंत्री महोदयांनी विषय समजून घेऊन याबाबत सर्व आराखडा व निधी मंजूर करून घेतलेले असून लवकरच कार्यान्वित होणार व कोरोनामुळे बंद पडलेले सर्व वसतिगृह दिवाळी नंतर सुरू करण्यास संबधित विभागाला तत्काळ सूचना करणार असे आश्र्वासित केलें वलवकरच सर्व वसतिगृह सुरू होणार असे सांगितले याप्रसंगी आनंदराव अंगलवार सह सतीश मालेकर, ए.ए. डहाक, चंद्रशेखर कोटेवार , विजय पोहनकर व बहुसंख्येने पदाधिकारी उपस्थित होते.