भाजपाचे तहसीलदार यांना निवेदन
वाशिम:-वाशिम जिल्हयातील सर्वच मार्गावर औरंगाबाद हे नाव बदलुन त्या
ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे नांव टाकण्यांचे आदेश योग्य त्या
अधिकाऱ्यास देवुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करणे बाबत चे निवेदन जिल्हाधिकारी वाशिम यांना तहसीलदार मंगरूळपीर यांचे मार्फत मंगरूळपीर भाजपा च्या वतीने दि. 18 रोजी निवेदन देण्यात आले.
निवेदनानुसार महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजी नगर असे केलेले आहे. त्याबाबत शासनाचे नोटीफीकेशन निघुन तीन महिण्यापेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरीही वाशिम जिल्ह्यातील अनेक बोर्डावर औरंगाबाद हेच नांव आहे. वाशिम जिल्ह्यात अजून पर्यन्त शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी १०० टक्के झालेली नाही. तरी वाशिम जिल्ह्यातील सर्वच ठिकाणी रोडवरील बोर्डावर औरंगाबाद नावाचे ठिकाणी छत्रपती संभाजीनगर असे करण्यांचे आदेश योग्य संबंधित अधिकाऱ्यास देवुन त्याची त्वरीत अंमलबजावणी करावी अशी मागणी भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.माजी तालुका अध्यक्ष रविंद्र ठाकरे यांनी निवेदन दिले.यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य पुरुषोत्तम चितलांगे, माजी नगराध्यक्ष विरेंद्र सिंह ठाकुर, तालुका अध्यक्ष हरिदास ठाकरे, शहर अध्यक्ष सतिश हिवरकर, सरचिटणीस राहुल अढाव,पं स.सदस्य अतुल गायकवाड, विलास गायकवाड, गजानन अवगन, नंदकिशोर भुजाडे, महादेव विश्वकर्मा, गोपाल शिंदे, डिंगाबर गांजरे, भानुदास टेकाडे, गोलु जाधव, विराग हिवरकर, सुनिल गोरटे,पंकज दुबे, गोपाल लुंगे, विठ्ठल दहातोंडे, गोपाल वर्मा, राहुल शुंगारे, गजानन धनवे, आनंदा राऊत, मुकेश शिंदे, सचिन पवार, किशोर इंगोले, सुनिल राठोड, गजानन बुंधे,सागर ठाकरे, गोपाल पाटील, भास्कर ढोरे, पदाधिकारी व कार्यकर्ते निवेदन देतांना मोठ्या संख्येने उपस्थित होते.