औरंगाबाद : कलियुगात हि माणुसकी जपणारा अलविया शनिवारी दिनांक 30 / 10 /2021 रोजी एका दैनिकाचे क्राईम रिपोर्टर पत्रकार फिरोज हसन शेख हे नेहमीप्रमाणे आपल्या कामावर जात असताना त्यांना टिव्ही सेंटर प्रभा दुध डेअरी समोर रस्त्यालगत एक बटवा दिसून आला बेवारस आढळून आलेल्या या बटव्यामध्ये 4590 रुपये मिळून आले, एसटी महामंडळाचा प्रवासाचा सवलतीचा पास व आधार कार्ड पॅन कार्ड आदी कागदपत्र मिळून आले. असता ते ज्याचे असेल त्यास परत करण्याचा मनसुबा आल्याने त्यांनी मूळ मालकाची शोधाशोध केली असता मिळून आले रोख रक्कम कागदपत्र मूळ मालकास परत केल्याने 73 वर्षीय आजोबांची डोळे पाणावले व गहिवरून आले.

73 वर्षीय मधुकर पंजाबी घर नंबर आर 28 एन-7, 182 रायगड नगर सिडको औरंगाबाद यांचा बटवा शनिवारी फिरोज हसन शेख यांना मिळून आला यात महत्वाचे कागदपत्र व रोख चार हजार पाचशे नव्वद रुपये सापडले असता आधार कार्ड च्या सहाय्याने मधुकर पंजाबी यांचा घराचा पत्ता शोधण्यासाठी पत्रकार शंकर धर्माधिकारी यांच्या मदतीने शोधा शोध सुरू केली असता तिन तासानंतर पंजाबी आजोबांचे घर मिळून आले. यावेळी सापडलेली रोख रक्कम व कागदपत्रे परत करण्यासाठी आलो असल्याचे यावेळी सांगितले असता, पंजाबी यांनी अश्रुंची वाट मोकळी करित डोळे पाणावले व गहिवरून आले. सापडलेले कागदपत्रे व रोख रक्कम यावेळी परत करण्यात आले.या कलयुगात सुद्धा फिरोज हसन शेख यांच्या सारखे स्वाभिमानी निस्वार्थी व होतकरू तरुण असल्याने त्यांचे कौतुक ही करण्यात आले. आज मला माणुसकी धर्म जोपासणारा अवलिया दिसून आल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.पंजाबी आजोबांचे सकाळी टिव्ही सेंटर ला काही कामानिमित्त आले असता गडबडीत त्यांचे पॉकेट पडले होते. परिसरात या विषयी माहिती रहिवाशांना मिळाली असता फिरोज शेख यांचे खुप कौतुक होत आहे.
प्रतिनिधी जब्बार तडवी औरंगाबाद