शहर काँग्रेस मध्ये 185 युवकांचा जाहीर प्रवेश नेत्यांच्या उपस्थितीत पडला पार
यवतमाळ : उमरखेड मध्ये होत असलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील काही आठवड्यापासून शहर काँग्रेस वर विश्वास दाखवत शेकडो कार्यकर्त्यांचे प्रवेश होत आहेत वेगवेगळ्या जाती-धर्माचे लोक युवक तरुण तडफदार चेहरे समोर येऊन पक्षाशी जुळत आहेत,मागील पाच वर्षांपासून सत्तेवर असलेल्यांवर खुलेआम नाराजी दाखवत मोठ्या प्रमाणात शहर काँग्रेस मध्ये प्रवेश होत आहेत

काल दिनांक 27 ऑक्टोबर रोजी उमरखेड येथील राम-रहीम नगर मधील शेकडो युवकांनी काँग्रेसचे युवा चेहरे जुबेर भाई कुरेशी व अनवर नेता यांच्या नेतृत्वात 185 च्या वर युवक व नागरिकांनी मोठ्या उल्हासात तातुभाऊ देशमुख सरचिटणीस महाराष्ट्र काँग्रेस कमिटी यांच्या अध्यक्षतेखाली व नंदकिशोरजी अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घेतले तसेच मुफ्ती आबेद साहब, हाजी गणी शहा, युसूफ सर, हाजी सत्तार बाबू,हाफिज अन्सार,हाजी भिकू साहब, इब्राहिम बागवान,सुलेमान गुरू,वासिफ पठाण, जहीर राज, सय्यद मोशीन, मुनाफभाई बर्तनवाले, इंतु बेग, अहेमदभाई राज भंगारवाले,नफीस ठेकेदार, अन्सार ठेकेदार, सय्यद सोहेब, सय्यद मोबीन, शेख इर्शाद,सोनू खतीब,भय्या पवार,सिद्धेश्वर जगताप, प्रकाश आर्य,गणेश रावते,निरंजन राठोड,वीरेंद्र खंदारे,राहुल काळबांडे, नवल कलोसे, इर्फान पटेल, शेख तवकिर यांच्या उपस्थितीत प्रवेश सोहळा पार पडला या प्रवेश कार्यक्रमध्ये तंजिम बेग व मित्र मंडळ, सय्यद मोबीन व मित्र मंडळ, शेख इर्शाद व मित्र मंडळ, वसीम भाई पठाण व मित्र मंडळ, सय्यद सोहेब व मित्र मंडळ, महमूद खान व मित्र मंडळ, शाहरुख बेग व मित्र मंडळ, जहीर राज व मित्र मंडळ, अन्सार ठेकेदार व मित्र मंडळ,अहमद भाई व मित्र मंडळ, माशु नेता व मित्र मंडळ, शेख मुनाफ व मित्र मंडळ, शेख फुरकान व मित्र मंडळ, जमीर ठेकेदार व मित्र मंडळ, शेख इमरान शेख बाबू मित्र मंडळ, फारुख कुरेशी व मित्र मंडळ,चांद कुरेशी व मित्र मंडळ, इत्यादी नागरिक व युवकांनी प्रवेश घेतला.प्रवेश कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जमीर पेंटर यांनी केले व आभार पप्पू भाई चिकन यांनी मानले