जि.प.सदस्या सौ.रूपालीताई पंदिलवार यांची पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून मागणी
गडचिरोली : कोरोना प्रादुर्भावामुळे संपुर्ण निधी कोविड १९ साठी वारण्यात आला. यामुळे विकास काम काम करण्यास या क्षेत्रात निधी उपलब्ध झाला नाही. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला, सर्व सुरळीत चालु असल्याने आष्टी ईल्लूर जि.प.क्षेत्रातील विविध विकास कामांना मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी जि.प.सदस्या सौ.रूपालीताई पंदिलवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनातून केली आहे.

चपराळा हे गाव तीर्थक्षेत्र असल्याने लाखो भाविक येत असतात. त्यामुळे चपराळा चौडमपल्ली रस्त्यावर असलेला रपटा पावसाळयात बुडालेला असतो त्यामुळे भाविकांना तिर्थक्षेत्र ठिकाणी अवागमणास अडचणिंचा सामना करावा लागतो. सदर बाब लक्षात घेता सदर रपटयाचे रूपांतर उंच पुलामध्ये करण्यात यावे, चपराळा मंदीर ते चौडमपल्ली रस्त्याचे खडीकरण करणे, चौडमपल्ली ते सिंगमपल्ली रस्त्याचे खडीकरण, चपराळा व सिंगमपल्ली येथे गोटूल बांधकाम, कुनघाडा माल ते रामनगट्टा पांदन रस्त्याचे खडीकरण व मोरीचे बांधकाम करणे, चपराळा हे अभयारण्या व तिर्थक्षेत्र असल्याने येथे प्राणिसंग्रहालय व पार्क करीता मंजुरी देणे तसेच नदीकिणाऱ्यावर बोटीची व पायऱ्यांची व्यवस्था करणे आदी विकास कामांकरिता मंजुरी देवून निधी उपलब्ध करून देण्यात यावे अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच गडचिरोली जिल्हयातील तेंदुपत्ता हा आदिवासी बांधवांचा व इतर बांधवांचा आर्थिक आधार देणारे एकमेव रोजगाराचे साधन आहे. परंतु आष्टी, अनखोडा, ईल्लूर, मार्कंडा (कं), बामनपेठ, सिंगणपल्ली, चौडमपल्ली, चपराळा, नागुलवाही, येल्ला इत्यादी क्षेत्र अभयारण्यात मोडत असल्याने नागरिकांना तेंदुपत्ता संकलन करणे खुप अडचणीचे आहे. करीता तेंदुपत्ता संकलनाकरीता मंजुरी तथा सवलत उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणीही जि.प.सदस्या सौ. रूपालीताई पंदिलवार यांनी पालकमंत्री एकनाथ शिंद यांना निवेदलातून केली आहे.
भास्कर फरकडे
एन टिव्ही न्यूज मराठी
चामोर्शी गडचिरोली